AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवला, ऑफलाईन अर्जही स्वीकारणार : हसन मुश्रीफ

ग्रामंपचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत साडे पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आलीय. (Hasan Mushrif Gram Panchayat Election)

ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवला, ऑफलाईन अर्जही स्वीकारणार : हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:08 PM
Share

मुंबई: राज्यातील 14 हजार 232 ग्रामंपचांयतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. ग्रामंपचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज आणि जातपडताळणीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येतील, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. तर, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज भरण्याची मुदत तीन वरुन साडे पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली. (Hasan Mushrif said  Gram Panchayat Election candidate application time extended)

सर्व्हर ओव्हर लोड

ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचे आणि जात पडताळणीचं टोकन देण्याचं सर्व्हर ओव्हरलोड झाले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश कालच (29 डिसेंबर) काढले आहेत. जातपडताळणीच टोकन सुद्धा ऑफलाईन ठेवले आहे. आता ऑनलाईनची आवश्यकता नाही, ऑफलाईन पण अर्ज करू शकता, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

उमेदवारांची चिंता दूर

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली होती. अर्ज न भरले जाण्याचीभीती होती ती आता दूर झालेली आहे, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

सरपंचपदासाठी बोली लोकशाहीसाठी घातक

बऱ्याच ठिकाणी सरपंचपदासाठी बोली लावली जातेय. ही प्रथा लोकशाही साठी घातक आहे. फक्त पैसेवालेच निवडून येतील, चांगले कार्यकार्ते निवडून येणार नाहीत. निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ही निवडणूक आयोगाकडे केली आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जिथे शक्य असेल तिथे राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आहे. आणि जिथे स्वबळाची ताकत असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवू, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. सर्व्हरवरती लोड आल्याने अनेक ठिकाणी अर्जच भरले जात नव्हते. त्यामुळे काम अत्यंत मंदगतीने सुरू होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने अखेर मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत दोन दिवस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

15 जानेवारीला मतदान

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

(Hasan Mushrif said  Gram Panchayat Election candidate application time extended)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.