पाठिंबा द्यावा तरी कसा? डिलिमिटेशन बिलावरून अमोल कोल्हेंची वेगळी भूमिका; आव्हाडांच्या विधानानंतर अजेंडा सांगून टाकला!

विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर आम्ही सगळे खासदार एकत्र बसून चर्चा करू. त्यानंतर पक्षनेतृत्त्वाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

पाठिंबा द्यावा तरी कसा? डिलिमिटेशन बिलावरून अमोल कोल्हेंची वेगळी भूमिका; आव्हाडांच्या विधानानंतर अजेंडा सांगून टाकला!
amol kolhe and nda support
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 7:15 PM

केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजुरीसाठी आणणार आहे. दोन्ही सभागृहांत विधेयक मंजूर व्हावे यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जातोय. या विधेयकाला शरद पवार यांचा पक्ष पाठिंबा देऊ शकतो, असे सांगितले जातेय. विशेष म्हणजे पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर आम्ही या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय, असं सांगून टाकलंय. असं असताना पवार गटातून आव्हाड यांच्या मताशी विसंगत भूमिका समोर येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित करताना आव्हाड यांच्या मतापेक्षा वेगळे मत मांडलेय. त्यामुळे पक्षात नेमकं काय घडतंय? असं विचारलं जातंय.

तो मसुदा आम्ही जोपर्यंत पूर्ण वाचत नाही तोपर्यंत…

आव्हाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना “अजून हा निर्णय झालेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयक मंजूर केल्यानंतर माध्यमात तीन मुद्दे समोर आले. कदाचित याच तीन मुद्द्यांवरून जितेंद्र आव्हाड यांनी विधान केले असावे. परंतु विधेयकाचा मसुदा जोपर्यंत आमच्या हातात येत नाही. तो मसुदा आम्ही जोपर्यंत पूर्ण वाचत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय होणार नाही,” असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

Loading...

अजूनही ड्राफ्ट आलेला नाही

विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर आम्ही सगळे खासदार एकत्र बसून चर्चा करू. त्यानंतर पक्षनेतृत्त्वाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना पक्षाने व्हिप जारी केलाय. हा व्हिप विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत आहे. दुसरी बाब म्हणजे अजूनही ड्राफ्ट आलेला नाही, निर्णय कसा होईल, असा सवालही त्यांनी केला.

तोपर्यंत आम्ही कसा निर्णय घेऊ शकतो?

एप्रिल महिन्यात हे विधेयक आले होते, त्याला आम्ही विरोध केला होता. कारण त्यात लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना होईल, अशी तरतूद होती. या तरतुदीमुळे दक्षिणेतील राज्यांना मोठा फटका बसणार होता. सरसकट 50 मतदारसंघ वाढले तर आम्ही यावर विचार करू, अशी काँग्रेसची भूमिका त्यावेळी होती. माध्यमांतील माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या बिलात सरसकट 50 टक्क्यांची अट आहे. त्यामुळे विधेयक जेव्हा संसदेत मांडले जाईल, ते आम्ही वाचणार नाही तोपर्यंत आम्ही कसा निर्णय घेऊ शकतो, अशी रोखठोक भूमिका अमोल कोल्हे यांनी केली. त्यामुळे आता पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us