खवय्यांची चौपाटी पुन्हा राजवाडा परिसरातच, छत्रपती उदयनराजेंच्या सूचनेने एकच जल्लोष

| Updated on: Mar 20, 2021 | 4:01 PM

साताऱ्यातील राजवाडा परिसरातील चौपाटी गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात सातारा नगरपालिकेने बंद ठेवली होती. (Udayanraje Satara Chowpaty Rajwada)

खवय्यांची चौपाटी पुन्हा राजवाडा परिसरातच, छत्रपती उदयनराजेंच्या सूचनेने एकच जल्लोष
छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या निर्णयाने व्यावसायिकांचा जल्लोष
Follow us on

सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरातील बंद केलेली खवय्यांची चौपाटी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosle) यांच्या मध्यस्थीनंतर मूळ जागेत सुरु होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात चौपाटी बंद ठेवण्यात आली होती. (MP Chhatrapati Udayanraje Bhosle directs to restart Satara Chowpaty at Rajwada)

साताऱ्यातील राजवाडा परिसरातील चौपाटी गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात सातारा नगरपालिकेने बंद ठेवली होती. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर ही चौपाटी नगरपालिकेने राजवाड्यावर सुरु न करता इतरत्र नेऊन सुरु ठेवण्याच्या सूचना व्यावसायिकांना केल्या होत्या.

अटी शर्तीवर चौपाटी राजवाडा सुरु

याबाबत भाजपचे राज्यसभा खासदार आज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत चौपाटीतील व्यावसायिकांची बैठक पार पडली. यामध्ये उदयनराजेंनी काही अटी शर्तीवर चौपाटी राजवाडा येथेच सुरु करण्याची सूचना नगरपालिकेला केल्या आहेत. आता यापुढील काळात राजवाडा परिसरातच चौपाटी सुरु होणार असल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनासंबंधी नियम पाळून चौपाटी मूळ जागेत

गेल्या काही महिन्यांपासून ही चौपाटी इतरत्र हलवल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. आता कोरोनासंबंधी नियमावली देऊन ही चौपाटी मूळ जागेत पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली आहे.

आळूचा खड्डा भागातील वाहनतळावर तात्पुरती चौपाटी

जानेवारी महिन्यात उदयजराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिर येथे बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी चौपाटीवरील 72 विक्रेत्यांना जागांचे वाटप करण्यात आले होते. ही चौपाटी गांधी मैदानाऐवजी आळूचा खड्डा येथील वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्याचा निर्णय झाला होता.

विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

कोरोनामुळे राजवाडा चौपाटी तब्बल आठ महिने बंंद होती. त्यामुळे येथील शंभराहून अधिक विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. शासनाने सर्व उद्योग, व्यवसाय, हॉटेल सुरु करण्यास परवानगी दिल्याने राजवाडा चौपाटीदेखील सुरु करण्यात यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी आणि सातारा पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नव्हता.

संबंधित बातम्या :

…अन् भररस्त्यात शंभुराज देसाईंनी उदयनराजेंना केला मुजरा

(MP Chhatrapati Udayanraje Bhosle directs to restart Satara Chowpaty at Rajwada)