सुप्रिया सुळे संतापल्या, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातम्यांवर स्पष्टच बोलल्या..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. हेच नाही तर त्यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचीही चर्चा आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे संतापल्या, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातम्यांवर स्पष्टच बोलल्या..
Supriya Sule and Sharad Pawar
| Updated on: Nov 24, 2026 | 12:03 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, पक्षाने एनडीएत सहभागी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. यावर आता सुप्रिया सुळे यांनी थेट प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, शरद पवार निवृत्त होणार नाहीत. कोणी निवृत्त व्हायचं हे जनता ठरवेल. राज्यसभेवर शरद पवार यांचे अजून 5 वर्ष आहेत. मग ते निवृत्त कसे होतील? एका वृत्तपत्रात शरद पवार यांच्या निवृत्तीबद्दल छापून आले होते, त्यावरच प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

हेच नाही तर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शरद पवार यांच्यासारख्या नेत्याबद्दल अशा निवृत्तीच्या बातम्या चालत असतील तर हे खरोखरच संतापजनक आहे. सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याये स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या निवृत्तीबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. हेच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्याही चर्चा रंगताना दिसल्या.

Loading...

शरद पवार रूग्णालयात असताना प्रफुल्ल पटेल त्यांच्या भेटीला पोहोचल्याने या चर्चांना अधिक उधाण आले. यासोबतच सुनील तटकरे यांनी म्हटले होते की, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिगीकरणाबद्दल आमच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. माझा भाऊ जिवंत असताना त्यावर चर्चा झाली होती.

पण ज्यादिवशी माझा भाऊ गेला, त्यावेळीच आमच्याबाजूने या चर्चा थांबल्या आहे. यावर आमच्या पक्षातील नेतेही भाष्य करत नाहीत. तो विषय आमच्यासाठी संपला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा ही सातत्याने रंगताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us