AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेल्यानंतर लागलीच फिंगरप्रिंट सेंसर बोटांचे ठसे ओळखत नाही ? काय नेमकं सत्य?

स्मार्टफोनचा फिंगरप्रिंट सेंसर जीवंत व्यक्तीच्या बोटांचे ठसे सहज ओळखतो. परंतू मृत्यूनंतर एखाद्याच्या बोटांचे ठसे ओळखणे फिंगरप्रिंट सेंसरला शक्य असते का ?

मेल्यानंतर लागलीच फिंगरप्रिंट सेंसर बोटांचे ठसे ओळखत नाही ? काय नेमकं सत्य?
fingerprint sensor
| Updated on: Nov 24, 2026 | 11:59 AM
Share

आजकाल जवळपास प्रत्येक मोबाईल फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर असतो. याच्या मदतीने तुम्ही फोन अनलॉक करण्यापासून ते बँकींग ऐप्स खोलणे, पैसे अदा करण्याची काम चुटकीसरशी करु शकता. यासाठी आपल्या अंगठ्याला किंवा इतर बोटांना सेंसरच्या जवळ न्यावे लागते आणि त्यानंतर बोटांच्या ठसे ओळखले जातात. परंतु जर माणसाचा मृत्यू झाल्यानंतर लागलीच किंवा नंतर फिंगर सेंसर त्या बोटाची ओळख करण्यात का चुकत ? कारण मेल्यानंतर माणसाच्या बोटांचे ठसे तसेच रहातात गायब होत नाहीत. मग असे काय बदलते की ज्यामुळे फोनचा सेंसर बोटांना ओळखत नाही ? याच्या मागे मानवी शरीर आणि फिंगरप्रिंट सेंसरच्या काम करण्याचे रहस्यमय विज्ञान लपलेले आहे.

फिंगर प्रिंट सेंसर कसे काम करते?

फोनमध्ये वापरले जाणारे अनेक फिंगरप्रिंट सेंसर कॅपेसिटिव्ह तंत्रावर ((Capacitive Technology) ) काम करतात. आपल्या बोटांचा पृष्टभाग फ्लॅट नसतो. त्यावर छोटे-छोटे उठावदार रेषांचे भाग आणि त्यात रिकाम्या जागा असतात. याच रेषांना फिंगरप्रिंट म्हटले जाते. प्रत्येक माणसाचा फिंगरप्रिंटचा पॅटर्न वेगळा असतो. जेव्हा तुम्ही बोटे सेंसरवर ठेवता, तेव्हा सेंसर या रेषांना आणि त्यांच्या दरम्यानच्या जागांना ओळखतो. कॅपेसिटिव्ह सेंसर बोटे आणि सेंसरच्या दरम्यान बनणाऱ्या खूप छोट्या इलेक्ट्रीक बदलांना म्हणजे इलेक्ट्रीक चार्ज मधील अंतराला मोजतो.

यामुळे सेंसरला कळते की बोटांच्या कोणती जागा उठावदार आणि कोणती खाली आहे हे कळते. यानंतर फोन या माहितीची तुलना आधी सेव्ह केलेल्या फिंगरप्रिंटशी करते. आणि दोन्हींचा पॅटर्न सारखाच असेल तर, तो फोन आपोआप अनलॉक होतो.

मृत्यूनंतर लागलीच बोटांत काय बदल होतो ? जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याच्या शरीरातील अनेक अवयव काम करणे बंद करतात. हृदय धडधड बंद होते आणि शरीरातील रक्तसंचार ठप्प होतो. त्यामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळणे बंद होते. याच्या त्वचेवर परिणाम होतो. जीवंत माणसाच्या त्वचेत पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स असतात. हे त्वचेच्या इलेक्ट्रीक गुणांना प्रभावित करतात. मृत्यूनंतर शरीरातील सामान्य जैविक क्रिया बंद होऊ लागतात. त्वचेची आद्रता आणि इलेक्ट्रीकल गुणांत काही वेळानंतर बदल होता. यामुळे कॅपेसिटिव्ह फिंगरप्रिंट सेंसर बोटांमधून पहिल्यासारखे इलेक्ट्रीकल प्रतिक्रिया होत नाही. त्यामुळे सेंसर फिंगरप्रिंटला योग्य प्रकारे वाचण्यास यशस्वी होऊ शकत नाही.

मात्र, हे समजणे गरजेचे आहे की मृत्यूनंतर लागलीच शरीरातील सर्व इलेक्ट्रीकल एक्टिव्हीटी एक साथ संपत नाही. पेशींमध्ये काही वेळापर्यंत अवशिष्ट प्रतिक्रिया सुरु राहु शकतात. त्यामुळे प्रत्येक फोन आणि परिस्थितीत फिंगरप्रिंट सेंसर काम करणे बंद करेलच असेही नाही.

मृत्यूनंतर फिंगर प्रिंटच्या रेषा काही गायब होत नाहीत. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञ मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे व्यक्तीची ओळख पटण्यासाठी वापर करु शकतात.

परंतू सर्वच फिंगरप्रिंट सेंसर एकसारखे काम करत नाहीत…

कॅपेसिटिव्ह सेंसर: हा बोट आणि सेंसर च्या दरम्यान इलेक्ट्रीक बदलांना ओळखतो.

ऑप्टिकल सेंसर – हा प्रकाशाच्या मदतीने बोटाच्या रेषांचा फोटो तयार करतो.

अल्ट्रासॉनिक सेंसर – हा ध्वनीतरंगाच्या मदतीने बोटांच्या पृष्ठभाग आणि त्यांच्या रचनेला ओळखतो.

मृत्यूनंतर प्रत्येक सेंसरचा व्यवहार एक सारखा नसल्याने काही सेंसर परिस्थितीच्या आधारे फिंगर प्रिंट ओळखून प्रतिसाद देतातही. तर काही सेंसर प्रतिसाद देत नाही.

Follow Us
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला