AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटिस खायचंय? शेफ रणवीर ब्रार यांची ही खास रेसिपी नक्की ट्राय करा

रगडा पॅटिस हा पावसाळा आणि हिवाळ्यात आवडीने खाल्ला जाणारा स्ट्रीट फूडचा प्रकार आहे. अनेक ठिकाणी मिळणाऱ्या या चटपटीत पदार्थाची चव खवय्यांना भुरळ घालते. तुम्हीही घरी सोप्या पद्धतीने रगडा पॅटिस बनवू शकता.

स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटिस खायचंय? शेफ रणवीर ब्रार यांची ही खास रेसिपी नक्की ट्राय करा
स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटिस रेसिपीImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 24, 2026 | 11:53 AM
Share

रगडा पॅटिस हा पावसाळा आणि हिवाळ्यात आवडीने खाल्ला जाणारा स्ट्रीट फूडचा प्रकार आहे. कुरकुरीत बटाट्याची पॅटिस, मऊ शिजवलेला मटाराचा रगडा, कांदा, शेव आणि चटण्यांमुळे या पदार्थाची चव आणखी वाढते. तुम्हालाही रगडा पॅटिस खाण्याची इच्छा झाली असेल, तर आता बाहेर जाण्याची गरज नाही. शेफ रणवीर ब्रार यांनी सांगितलेल्या रेसिपीनुसार तुम्ही हा चटपटीत पदार्थ घरीच बनवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया साहित्य आणि कृती.

पॅटिस बनवण्यासाठी साहित्य

  • 3 मध्यम आकाराचे उकडलेले आणि किसलेले बटाटे
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा लसूण-हिरवी मिरची पेस्ट
  • 3 पांढऱ्या ब्रेडचे कडा काढलेले तुकडे
  • तळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल

रगड्यासाठी साहित्य

  • 2 कप पांढरे वाटाणे
  •  मीठ आणि हळद पावडर
  • आवश्यकतेनुसार पाणी

रगडा पॅटिससाठी इतर साहित्य

  • 4 मोठे चमचे हिरवी चटणी
  • आंबट-गोड चटणी
  •  ¼ छोटा चमचा लाल तिखट
  • ½ कप बारीक चिरलेला कांदा
  • ¼ कप बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 ताजी हिरवी मिरची (चिरलेली)
  • ½ छोटा चमचा सुकी लसूण चटणी
  • 1मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 2 मोठे चमचे शेव
  • ¼ छोटा चमचा भाजलेले जिरे पावडर
  • ¼ छोटा चमचा चाट मसाला
  •  ¼ कप डाळिंबाचे दाणे
  • लिंबाच्या फोडी

पॅटिस बनवण्याची कृती

  1. सर्वप्रथम एका भांड्यात किसलेले बटाटे, मीठ, लसूण-हिरवी मिरची पेस्ट आणि पांढऱ्या ब्रेडचे तुकडे घ्या.
  2. हे सर्व साहित्य बटाट्यांमध्ये व्यवस्थित एकत्र करा आणि ५ ते १० मिनिटे बाजूला ठेवा.
  3. त्यानंतर या मिश्रणाचे गोलाकार टिक्की तयार करा.
  4. बटाट्याचे मिश्रण जास्त ओलसर असल्यास त्यात कॉर्न स्टार्च किंवा अरारूट मिसळा.
  5. तयार केलेल्या टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तेलात तळून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.

रगडा बनवण्याची कृती

  1. एका पॅनमध्ये पाणी आणि हळद व मीठ घालून शिजवलेले पांढरे वाटाणे घाला.
  2. मिश्रणाला उकळी येऊ द्या.
  3. रगडा बनवताना जास्त पाणी घालू नका. कारण रगडा खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावा.

रगडा पॅटिस तयार करण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम सर्व्हिंग प्लेटमध्ये गरम रगडा घाला. त्यावर थोडी हिरवी चटणी आणि आंबट-गोड चटणी घाला.
  2. त्यानंतर मटाराच्या रगड्यावर तयार केलेल्या बटाट्याच्या पॅटिस ठेवा.
  3. त्यावर थोडे लाल तिखट, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि सुकी लसूण चटणी घाला.
  4. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव, भाजलेले जिरे पावडर, चाट मसाला, डाळिंबाचे दाणे आणि लिंबाच्या फोडींनी सजवा.
  5. तयार रगडा पॅटिस लगेच गरमागरम सर्व्ह करा.

Follow Us
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन