मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यानंतर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मागून येणाऱ्या एका गाडीने सुळे यांच्या कारला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने गाडीतील प्रवासी सुखरूप आहेत.
सर्वजण सुखरूप
या अपघाताबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन क्रमांक GJ 13 CF 5257 ने माझ्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत.
वाहन चालवताना काळजी घ्या
अशा प्रकारच्या घटना ही एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा करणे यामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करतो की, कृपया सीट बेल्ट वापरा, सावध राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा; जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील.
While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe.
Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on… pic.twitter.com/WrOGsNzqLX
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2026
मुंबई पुणे महामार्गावर अनेक अपघात होत असतात. अनेकदा यात मोठी जीवितहानीही पहायला मिळालेली आहे. अनेकदा असे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. त्यामुळेच या अपघातानंतर आता सुप्रिया सुळे यांनी वाहने सावकाश चालवण्याचे व वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. या अपघातात सुप्रिया सुळे यांच्या गाडीचे थोडे नुकसानही झाल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला-पातूर रोडवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
अकोला ते पातूर रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोघेही युवक अकोला-पातूर रोडवरील दिल्ली दरबार हॉटेलमध्ये जेवण करून दुचाकीने अकोल्याकडे परतत होते. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून अपघातानंतर जखमीला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.