सक्तीची रजा नाही.. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Vivek Bhimanwar MPSC Protest Pune : रोहित पवार आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जात असल्याचे सांगितले जातंय. मात्र, याबाबत स्वत: भीमनवार यांनी मोठा खुलासा केला.

सक्तीची रजा नाही.. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Vivek Bhimanwar
| Updated on: Oct 12, 2026 | 7:53 AM

पुण्यातील एमपीएससी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. आता या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या सचिव पदी आयएएस ऑफीसर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी केली आहे. यासोबतच एमपीएससीचे अध्यक्षांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे सांगितले जातंय. मात्र, आपल्याला सक्तीच्या रजेवर पाठवले नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आमदार रोहित पवार पुण्यात आंदोलनाकरिता बसले होते. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले. MPSC आंदोलनाबाबत रोहित पवार, मंत्री शिवेंद्रराजेंमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांचा मेसेज घेऊन मंत्री शिवेंद्रसिंह राजे आले आणि त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असल्याचा आरोप केला जातो. त्यातच आता चाैकशी समितीची स्थापना करण्यात आला. भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना भीमनवार दिसले असून त्यांनी स्पष्ट केले की, मला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले नाहीये.

Loading...

भीमनवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. आपल्या पोस्टमध्ये भीमनवार यांनी म्हटले की, एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चाैकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चाैकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते या पुढेहीही असेल. जय हिंद.. जय महाराष्ट्र…

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात सातत्याने भीमनवार यांच्यावर आरोप केली जात होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यातच रोहित पवार या उपोषणाला बसले. विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन करत होते. अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. न्यायालयीन चाैकशीची स्थापना करण्यात आली. या चाैकशी समितीत तुकाराम मुंढे यांच्याही नावाचा समावेश केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us