एमपीएससी अध्यक्षांच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी, कशा पार पडल्या परीक्षा?

| Updated on: Feb 26, 2022 | 4:01 PM

परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर (Kishorraje Nimbalkar) यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली.

एमपीएससी अध्यक्षांच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी, कशा पार पडल्या परीक्षा?
MPSC च्या परीक्षा सुरळीत पार पडल्या
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (Exam) 2021 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 1098 उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर (Kishorraje Nimbalkar) यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील 666 पदांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील 1098 परीक्षा केंद्रांवर 3 लाख 62 हजार 319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून या परीक्षा प्रक्रियेची निंबाळकर यांनी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाला आणि कर्वे रोडवरील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाच्या केंद्रांवर सुरु असलेल्या परीक्षा प्रक्रियेची निंबाळकर यांनी पाहणी केली.

23 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात आली, त्यावेळीही नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती. राज्यातील सर्व केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2021 सुरळीतपणे पार पडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

स्वतः अध्यक्ष परीक्षा केंद्रांना भेटी देत असून परीक्षा प्रक्रिया आणि नियोजनाची माहिती घेत आहेत. आयोगाकडे प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया लवकर करण्यासाठी आयोग ‘ॲक्शन मोड’मध्ये असून दोन दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध पदांच्या मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचा निकाल व गुणवत्ता यादी त्याच दिवशी जाहीर केली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.

SSC | दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा एलिमेंटरीशिवाय देता येणार इंटरमिजिएट परीक्षा, परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता

11 वाजता पेपर, साडेनऊलाच थर्मल स्क्रिनिंग, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वीही ‘परीक्षा’

HSC Exam Time Table : बारावी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नव्या तारखांसह सविस्तर वेळापत्रक, एका क्लिक वर