HSC Exam Time Table : बारावी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नव्या तारखांसह सविस्तर वेळापत्रक, एका क्लिक वर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBHSE) यांच्याकडून बारावीच्या परीक्षा (HSC Exam ) 4 मार्च  पासून सुरु होणार आहेत.

HSC Exam Time Table : बारावी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नव्या तारखांसह सविस्तर वेळापत्रक, एका क्लिक वर
HSC Exam Schedule
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 6:19 PM

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBHSE) यांच्याकडून बारावीच्या परीक्षा (HSC Exam ) 4 मार्च  पासून सुरु होणार आहेत. बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात (HSC Exam Schedule Change) अपरिहार्य कारणामुळं काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सर्वसाधारण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी या दिवशी घेण्यात येणारे पेपर आता 5 एप्रिल आणि 7 एप्रिलला होणार आहेत.5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. हे पेपर आता 5 एप्रिलला होतील. तर, 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर 7 मार्चला होईल.

बारावी परीक्षेचं बदलासंह संपूर्ण वेळापत्रक

वार आणि दिनांक वेळ प्रथम सत्रवेळ द्वितीय सत्र
4 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 2.00इंग्रजी
5 एप्रिल 2022 मंगळवार10.30 ते 2.00हिंदी 03.00 ते 6.30जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन
07 एप्रिल 2022 गुरुवार10.30 ते 2.00मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, 03.00 ते 6.30उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश, पाली
8 मार्च 2022 मंगळवार10.30 ते 2.00महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत 03.00 ते 6.30रशियन, अरेबिक
09 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 2.00वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
10 मार्च 2022 गुरुवार 10.30 ते 2.00तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
11 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 2.00चिटणासाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
12 मार्च 2022 शनिवार10.30 ते 2.00रसायनशास्त्र03.00 ते 6.30राज्यशास्त्र (कला व वाणिज्य)
14 मार्च 2022 सोमवार 10.30 ते 2.00गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान), गणित संख्याशास्त्र (वाणिज्य)03.00 ते 5.45तालवाद्य नियमित व पुनर्परीक्षार्थी
15 मार्च 2022 मंगळवार10.30 ते 2.00बालविकास, कृषि विज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
16 मार्च 2022 बुधवार10.30 ते 2.00सहकार (कला, वाणिज्य)
17 मार्च 2022 गुरुवार10.30 ते 2.00जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास, (नियमित व पुनर्परिक्षार्थी )
19 मार्च 2022 शनिवार10.30 ते 2.00भूशास्त्र03.00 ते 6.30अर्थशास्त्र
21 मार्च 2022 सोमवार 10.30 ते 2.00वस्त्रशास्त्र03.00 ते 6.30पुस्तपालन आणि लेखाकर्म
22 मार्च 2022 मंगळवार 10.30 ते 2.00अन्नविज्ञान व तंत्रज्ञान 03.00 ते 6.30तत्वज्ञान , कलेचा इतिहास व रसग्रहण, चित्र, शिल्प व वास्तुशास्त्र, नियमित व पुनर्परीक्षार्थी
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 1.15व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर 1, तंत्रगट १, विद्युत परिरक्षण, यांत्रिक परिरक्षण, स्कुटर व मोटर सायकल संधारण, 03.00 ते 6.30शिक्षणशास्त्र ,
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 1.45सर्वसाधारण स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स संगणक शास्त्र03.00 ते 6.30मल्टी टास्किंग टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर इन्स्टॉलेशन टेक्निशियन अँड पेरिफेरन्स (पुनर्परीक्षार्थी), मल्टी टास्किंग टेक्निशियन (फुड प्रोसेसिंग), इलेक्ट्रॉनिक्स (फिल्ड टेक्निशियन वायरम कंट्रोल पॅनेल), पॉवर डिस्ट्रीब्युशन लाईनमन
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 2.00वाणिज्य गट पेपर क्रमांक 1 बँक व्यवस्थापन , कार्यालय व्यवस्थापन, विपणन आणि विक्रय कला, लघुउद्योग आणि स्वंयरोजगार
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 12.45कृषी गट पेपर 1 पशू संवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पीक शास्त्र, फलोत्पादन,
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 1.45मत्स्य व्यवसाय गट पेपर 1,मत्स्य संस्करण तंत्रज्ञान , गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन03.00 ते 5.15अॅपेरल्स स्पेशलाईज्ड सुइंग मशीन ऑपरेटर, प्लंबर-जनरल-२ ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशिअन, रिटेल सेल्स असोसिएट हेल्थकेअर जनरल ड्यूटी असिस्टंट, ब्युटी थेरपिस्ट, अॅग्रिकल्चर मायक्रोइरीगेशन, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी कस्टमर सर्व्हिस, एक्झिक्युटीव्ह (मिट अँड ग्रीट)
24 मार्च 2022 बुधवार 3.00 ते 6.30मानसशास्त्र
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 1.15व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर 2, विद्युत परिरक्षण, यांत्रिक परिरक्षण, स्कुटर व मोटर सायकल संधारण
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 1.45सर्वसाधारण स्थापत्य अभिायांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 2.00वाणिज्य पेपर गट पेपर 2 बँक व्यवसाय, कार्यालय व्यवस्थापन, विपणन आणि विक्रय कला, लघुउद्योग आणि स्वंयरोजगार
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 12.45कृषी गट पेपर 2 पशु संवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पीक शास्त्र, फलोत्पादन
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 12.45मत्स्य व्यवसाय पेपर गट 2 मत्स्य संस्करण तंत्रज्ञान, गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन
26 मार्च 2022 शनिवार 3.00 ते 6.30भूगोल
28 मार्च 2022 सोमवार 3.00 ते 6.30इतिहास
29 मार्च 2022 मंगळवार 3.00 ते 6.30संसरक्षणशास्त्र
30 मार्च 2022 बुधवार 3.00 ते 6.30समाजशास्त्र
माहिती तंत्रज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 31 मार्च, 1 एप्रिल, 4 एप्रिल रोजी दोन सत्रात घेण्यात येईल. तर सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 1, 4,5, एप्रिल या दिवशी दोन सत्रात घेण्यात येईल.

वेळापत्रकात बदल का?

बोर्डाच्या वाहनाला संगमनेर येथे आग लागली होती. त्या आगीत पेपर जळून नष्ट झाल्याची माहिती आहे.त्यामुळं बोर्डानं 5 आणि 7 मार्च रोजी होणारे पेपर आता एप्रिल महिन्यात घेणार आहे.

बारावीच्या परीक्षा कधीपासून सुरु?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्चपासून  सुरु होणार आहेत. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

दहावीच्या परीक्षा 15 मार्चपासून

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

इतर बातम्या:

HSC Exam Update : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर, नेमकं कारण काय?

दहावी बारावी ऑफलाईन परीक्षांचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टानं विरोधी याचिका फेटाळली

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.