पुण्यात खाजगी वाहिनीच्या पत्रकाराला एमपीएससीच्या विद्यार्थ्याची मारहाण, रोहित पवार यांच्याशी बोलत असताना घडली घटना

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असताना एका खाजगी वाहिनीच्या पत्रकाराला एका विद्यार्थ्यांने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

पुण्यात खाजगी वाहिनीच्या पत्रकाराला एमपीएससीच्या विद्यार्थ्याची मारहाण, रोहित पवार यांच्याशी बोलत असताना घडली घटना
rohit pawar and navnath ban
| Updated on: Oct 01, 2026 | 9:39 PM

पुण्यात एका खाजगी वाहिनीच्या पत्रकाराला एमपीएससीच्या विद्यार्थ्याची मारहाण केल्याची घटना घडली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार बोलत असताना या विद्यार्थ्याने मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणानंत पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. हा विद्यार्थी एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता, आणि त्याला मुद्दामहून आंदोलनात घुसवल्यात आले असावे अशी शंका  रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात आंदोलन कुणी केले होते. रोहित पवारांनी मग त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचे काम रोहित पवारांचे आहे. ते नाहक अभाविपचे नाव घेत आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करुन काय ते सत्य समोर आणावे अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे.

पुणे येथे गेले अनेक दिवस एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या दरम्यान आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत असताना एका खाजगी वाहिनीच्या पत्रकाराला एमपीएससीच्या विद्यार्थ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी या विद्यार्थ्याने आई बहिणीवरुन शिव्या दिल्या आणि मारहाण केली आहे. हा विद्यार्थी दारु प्यायलेला होता. आम्ही या विद्यार्थ्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. पोलिस आता त्याला ताब्यात घेतील असे रोहित पवार यांनी सांगितले. या विद्यार्थी आईवरुन शिव्या देत होता. येथे एमपीएससीचे आंदोलन करणारे गरीब घरातील विद्यार्थी आहेत. हा अभाविपचा कार्यकर्ता असावा अशी शंकाही पवार यांनी व्यक्त केली आहे.  भाजपाने त्याला मुद्दामहून आंदोलनात फूट पडण्यासाठी आणले असावे असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Loading...

येथे पोस्ट वाचा –

पोलिसांनी तपास पूर्ण करावा

दरम्यान, हे आंदोलन सुरुवातीपासून रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. त्यामुळे हे सर्व त्यांचे विद्यार्थी आहेत. त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण नाही हेच या घटनेतून सिद्ध होते. आपले दोष लपवण्यासाठी रोहित पवार नाहक अभाविपवर आरोप करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तपास पूर्ण करुन दूध का दूध पानी का पानी सिद्ध करावे असे भाजपाचे प्रवक्त नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us