मुंबईकरांच्या चिंता वाढणार, ऑटो-टॅक्सीच्या भाडेवाढीचे संकेत, किती रुपयांनी प्रवास महागणार?

Mumbai Auto-Taxi Fare: मध्यमवर्गीयांसाठी महागाई होणं हे काही आता नवीन राहिलेले नाही. दरदिवसी काही ना काही महाग होतच असतात. यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा झटका बसतो. आता  मुंबईतील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे.

मुंबईकरांच्या चिंता वाढणार, ऑटो-टॅक्सीच्या भाडेवाढीचे संकेत, किती रुपयांनी प्रवास महागणार?
| Updated on: Aug 14, 2026 | 11:27 AM

मध्यमवर्गीयांसाठी महागाई होणं हे काही आता नवीन राहिलेले नाही. दरदिवसी काही ना काही महाग होतच असतात. यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा झटका बसतो. आता  मुंबईतील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईकरांना आता महागाईचा धक्का बसला आहे. मुंबईकरांचा रिक्षा- टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे. शहरातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच परिवहन विभागाकडून पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी सध्यापेक्षा अधिक भाडे मोजावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या मुंबईतील ऑटो-रिक्षांचे किमान भाडे ₹26 आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास प्रस्तावित दरवाढीनुसार हे भाडे एक रुपयांनी वाढून ₹27 होणार आहे. म्हणजेच ऑटो-रिक्षाच्या किमान प्रवासासाठी प्रवाशांना सध्याच्या तुलनेत ₹1 अधिक द्यावे मोजावे लागणार आहे. ऑटो-रिक्षासोबत  मुंबईतील टॅक्सीच्या किमान भाड्यातही वाढ प्रस्तावित आहे. आता 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडे ₹31 आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास हे भाडे दोन रुपयांनी वाढून ₹33 होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून यापेक्षा अधिक वाढीची मागणी करण्यात आली आहे. वाढत्या खर्चाचा विचार करून किमान ₹4 भाडेवाढ करावी, अशी मागणी आहे.

भाडेवाढीमागे नेमके कारण काय?

  • पेट्रोल-डिझेलचा वाढता खर्च
  • वाहनांच्या देखभालचा खर्च
  • विम्याचा खर्च
  • परमिटचा खर्च

चालक संघटनांच्या मते, गेल्या काही वर्षांत खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र भाड्यात त्यानुसार बदल झालेला नसल्याने चालकांच्या कमाईवर परिणाम होत आहे.

भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणकडे पाठवण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या प्रस्तावाचा MMRTA कडून आढावा घेतला जाईल आहे. त्यामुळे सध्या ही प्रस्तावित भाडेवाढ असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन दरवाढ लागू होईल. दरम्यान, प्रस्तावित भाडेवाढीला प्रवासी संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता नाकारली जात नाही. आता नेमकं काय होतं यावर प्रवाशांचे लक्ष असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us