Mumbai AC Local : मुंबईत सर्व लोकल एसी होणार, तिकीट दर वाढणार का? महत्त्वाची अपडेट समोर
मुंबईकरांसाठी गुडन्यूज हाती आली आहे. कोणतीही भाडेवाढ न होता एसी लोकलची सेवा मुंबईकरांना मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत सर्व लोकल ट्रेन पुढील तीन वर्षांत मेट्रोसारख्या एसी होणार आहेत. मुंबईतील सर्व लोकल ट्रेन 2029 पर्यंत एसी होणार आहेत. मुंबई शहाराला एकूण 238 एसी लोकल मिळणार आहेत. लोकल ट्रेनच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात येणार असल्याचे समोर आलं आहे. या लोकल ट्रेनची निर्मिती सुरू असल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली. फडणवीस यांनी म्हटलं की, मुंबईच्या लोकल ट्रेनला आधुनिक बनवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी महत्त्वाची बैठक झाली. त्यावेळी लोकलबाबत चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकलबाबत महत्वाचा निर्णय घेतला. नव्या एसी लोकल ट्रेन या वंदे भारत ट्रेन बनत असलेल्या कारखान्यात तयार केल्या जात आहेत’.
तिकीट दरात वाढ होणार का?
तीन वर्षांत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व लोकल २०२९- ३० पर्यंत वातानुकूलित होणार आहेत. मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलची निर्मिती सुरू असून त्यातील पहिली गाडी पुढच्या वर्षी २०२७ मध्ये दाखल होईल. लोकल एसी झाल्या तरी सामान्य प्रवाशांवर तिकिटाचा बोजा वाढणार नाही. सेकंड क्लासच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईकरांना किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 238 एसी लोकलची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने 238 एसी लोकल मंजूर केल्या आहेत. खरंतर या लोकलासाठी 2030 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार होती. मुंबईकरांच्या सेवेत 2027 सालापासून एसी लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढच्या वर्षीच एसी लोकलचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सर्व एसी लोकल 2029 सालापर्यंत ताफ्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
