AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, लवकरच 238 लोकल मिळणार; मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठी बातमी दिली आहे की, लवकरच मुंबई लोकल ट्रेनचा अनुभव बदलणार आहे. 2029 पर्यंत सर्व लोकल एसी आणि मेट्रोसारख्या आधुनिक होतील. मुंबईला एकूण 238 नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत. विशेष म्हणजे, सेकंड क्लासच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, लवकरच 238 लोकल मिळणार; मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज
cm devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 1:36 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकारांना मोठी गुड न्यूज दिली आहे. मुंबईतील सर्व लोकल लवकरच मेट्रो सारख्या एसी होणार आहेत. या ट्रेन बनविण्याचं काम सुरू आहे. 2029पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार आहेत. मुंबईला एकूण 238 लोकल मिळणार आहेत. विशेष म्हणजे सेकंड क्लासची भाडेवाढही केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना मेट्रो बाबतची मोठी माहिती दिली.

मुंबईच्या लोकल ट्रेनला आधुनिक बनवू, असा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रो सारख्या लोकल मिळाव्यात अशी चर्चा झाली होती. पण त्यात विलंब होत होता. ज्या गतीने काम सुरू होतं. त्या गतीने 2030च्या पूर्वी ट्रेन मिळाल्या नसत्या. त्यामुळे मध्यंतरी केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी बैठक झाली, त्यात लोकलबाबतची चर्चा केली. काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत निर्णय घेतला. केंद्राची तीन कोच फॅक्ट्री आहेत. तिथे वेगाने ट्रेन बनवण्याचं काम सुरू आहे. वंदे भारत ट्रेन बनत असलेल्या कारखान्यात ट्रेन तयार होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाडेवाढ होणार नाही

2027 मध्ये पहिली मालिका ट्रेनची यावी. त्यानंतर 2029 पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, सुंदर आणि एसी व्हाव्यात. एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं भाडं वाढणार नाही. मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. देशातील आधुनिक पद्धती तयार होत आहे, असं सांगत आधुनिक ट्रेन देत असल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

पुढच्या वर्षीपासूनच लोकल येणार

मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल केंद्राने मंजूर केल्या आहेत. या लोकलसाठी 2030 पर्यंत करावी प्रतिक्षा करावी लागणार होती. आता मात्र 2027 पासून एसी लोकल सेवेत येण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीच मुंबईकरांना एसी लोकलचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर 2029 पर्यंत सर्वच एसी लोकल ताफ्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधक पळपुटे

विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संविधानात लोकशाहीचा मोठा फोरम संविधान आहे. पण विरोधक चर्चा करायला घाबरत आहेत. विरोधी पक्षात संसद फेस करण्याची हिंमत नाही. हे पळपुटे आहेत. चर्चेची जागा संसद आहे. चौक नाही. संविधानावर विश्वास असेल तर हिंमत दाखवा आणि संसदेत चर्चा करा. पहिल्यांदा बहाणा केला. अमित शाह येत नाही. अमित शाहांनी पत्र दिलं. त्यानंतर संसदेतून विरोधक तोंड लपवून पळाले, असं घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?