
मुंबई विमानतळ हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ असून दररोज लाखोच्या घरात प्रवासी येथून ये-जा करतात. जगातील जवळपास सर्वच देशाचे विमाने येथून टेकऑफ करतात आणि लॅंन्डही. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्यंत मोठे आहे. दर चार मिनिटाला येथे विमान लॅंन्ड होते आणि टेकऑफही. अत्यंत खास पद्धतीने सर्व गोष्टींचे नियोजन येथे बघायला मिळते. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. काही तासांसाठी विमानतळ बंद राहणार आहे. मुंबई विमानतळ 20 नोव्हेंबर 2025 रोजी बंद राहणार आहे. यादरम्यानच्या काळात कोणतेही विमान लॅंन्ड करणार नाही आणि टेकऑफही नाही. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान रनवे बंद राहणार आहे.
दर चार मिनिटाला येथे विमान लॅंन्ड होते. मात्र, आता तब्बल 11 ते 5 विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. याबद्दलचे एक निवेदन देखील जारी करण्यात आलंय. यादरम्यानची बरीच विमाने रद्द करण्यात आली असून काहींचे मार्ग बदलली आहेत. रनवे काही तासांसाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. याबद्दलची कल्पना प्रशासनाकडून अगोदरच विमान कंपन्यांना देण्यात आली. त्यानुसार, विमान कंपन्यांनी नियोजन केले आहे.
बऱ्याच कंपन्यांनी विमाने रद्द केली असून मुंबई विमानतळाऐवजी काही इतर ठिकाणी विमाने लॅंन्ड करण्याचा निर्णय घेतला. वार्षिक पावसाळ्यानंतरच्या देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा हा नियोजित कार्यक्रम असेल. याचे नियोजन मागील काही महिन्यांपासून सुरू होते. पावसाळ्यादरम्यान धावपळींचे बऱ्याचदा नुकसान होते. त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी काही तास मुंबई विमानतळ बंद असेल.
आता थंडीचा कडाका मुंबईमध्ये वाढला आहे. जवळपास पावसाचे ढग गेली आहेत. त्यामध्ये आता शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेचे काम केले जाणार आहे. विदेशात जाणारी मोठी विमाने मोठ्या संख्येने मुंबईतून जातात. त्यांच्याही वेळा बदलल्याची माहिती सध्या मिळत आहे. 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 5 दरम्यान विमानतळ बंद असेल, असे स्पष्टपणे निवेदनात प्रशानाने म्हटले.