AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 24 तास धोक्याचे! राज्यावर मोठं संकट, लाटेचा थेट इशारा, 19 आणि 20 नोव्हेंबरला..

Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याचे बघायला मिळतंय. सातत्याने वातावरणात मोठा बदल होताना दिसतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

पुढील 24 तास धोक्याचे! राज्यावर मोठं संकट, लाटेचा थेट इशारा, 19 आणि 20 नोव्हेंबरला..
cold wave
| Updated on: Nov 19, 2025 | 8:04 AM
Share

राज्यात गारठा चांगला वाढला असून पारा घसरताना दिसतोय. उत्तर भारतातून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी पहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये उत्तर भारतामधील थंडी वाढण्याचा इशारा आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. राज्यातही थंडीच्या लाटेचा इशारा आहे. एकीकडे काही राज्यात गारठा वाढला आहे तर काही राज्यांमध्ये अजूनही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. देशात दोन वेगवेगळ्या परिस्थिती असून केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये थंडीची लाट येणार आहे.

काही ठिराणी पारा 10 अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता राज्यात आहे. परभणी आणि जेऊरमध्ये 7 अंश तापमानाची नोंद झाली. जळगाव 7.1 अंश, निफाड 8.3, आहिल्यानगर 8.4 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद झाली. पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, गोदिंया, भंडारा, यवतमाळ, वाशिम या भागात पारा 10 अंशांच्या खाली गेला. दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आज आणि उद्या पावसाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडीची तीव्र लाट येणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. तापमानात अचानक घट झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. देवरी शहरासह परिसरात सकाळच्या सुमारास दाट धुक्याने अक्षरशः चादर पांघरली. रस्त्यावर काही मीटर अंतरावरही पुढील व्यक्ती किंवा वाहन स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे संपूर्ण परिसरात अंधारमय वातावरण निर्माण झाले होते.

देवरी नगरपंचायत मैदानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना देखील धुक्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्ण मैदान दाट धुक्याने आच्छादित झाल्याने पायी चालणारे एकमेकांना ओळखूही शकत नव्हते. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला असून, तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात 17.4 अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात 21.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान किमान तापमानातील ही घट पुढील एक ते दोन दिवस कायम राहणार आहे. याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेले काही दिवस मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात चढ -उतार होत आहे. राज्याबरोबरच मुंबईतही पहाटे आणि रात्री थंडी तसेच दिवसभर बोचरे वारे अनुभवायला मिळत आहेत.

मुंबईतील सांताक्रूझ येथे मंगळवारी हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तेथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा 3.8 अंश सेल्सिअसने कमी होते. या हंगामातील मागील सर्वात कमी किमान तापमान 16 नोव्हेंबर रोजी 17.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पारा 18 अंश सेल्सिअसखाली नोंदला गेला.

जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडीने कहर केला आहे. 18 नोव्हेंबर रोजी पहाटे जळगाव शहराच्या तापमानाने 23 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला असून, पारा थेट 7.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. यापूर्वी, 2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान 7.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. मात्र, सोमवारी रात्री आणि मंगळवारच्या पहाटेच्या तापमानाने हा जुना विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय हवामान खाते आणि ममुराबाद वेधशाळेकडे या विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. डिसेंबर आणि जानेवारीत आणखी तापमान कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात थंडीचा कडका वाढला, शहरासह जिल्ह्यात हूडहुडी. मंगळवारी पुण्याचे किमान तापमान 9.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे तर जिल्ह्यातही थंडीचा कडाका कायम असून, हवेली येथे सर्वात नीचांकी तापमान 6.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तरेकडून पुणे शहराच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे.. त्यामुळं पुणे परिसरात थंडीचा हा कडका वाढलाय.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.