AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठ संकट! थंडीच्या लाटेसह अतिमुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याची…

Maharashtra Weather Update : राज्यात भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा देत येलो अलर्ट जारी केला. मागील काही दिवसांपासून देशातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यावर मोठ संकट! थंडीच्या लाटेसह अतिमुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी, पुढील 24 तास धोक्याची...
yellow alert
| Updated on: Nov 17, 2025 | 7:29 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात चक्क पाऊस पडताना दिसला. राज्यात आता गारठा वाढला असून थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आलाय. मात्र, देशावरील पावसाचे ढग अजूनही कायमच असल्याचे बघायला मिळतंय. अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. पुण्यात थंडीचा कडाका वाढला किमान तापमान 10.6°c वर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसात कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. निफाड, धुळ्यात पारा आठ अंशावर पोहोचला. उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह सुरू असल्याने राज्यातील थंडी वाढली आहे. पहाटे धुके पडत असून दव पडत आहेत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा देत येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

परभणीमध्य़े 8.5 अंश तापमानाची नोंद झाली. गोदिंया, जेऊर, भंडारा 10 अंशपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली. राज्यात जरी थंडी वाढत असतील तरीही देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पावसासह जोरदार वारे वाहणार आहे. काल केरळच्या काही भागांमध्ये पाऊस झाल्याची माहिती असून असूनही मुसळधार पावसाचे संकट कायम आहे.

17, 18, 19, 20 नोव्हेंबरदरम्यान पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. केरळमध्ये पुढील काही दिवस पाऊस बघायला मिळेल. 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका देखील असणार आहे. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. यासोबतच पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.