मुंबईतील आंदोलनानंतर अभिजित दिपकेंना पहिला मोठा झटका; ती चूक भोवणार? सीजेपीची टीम अडचणीत, मोठी बातमी समोर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, आपल्या या मागणीसाठी आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, आपल्या या मागणीसाठी आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. देशाच्या विविध भागातून आलेल्या जेन झीने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचं पहायला मिळालं. मात्र आता या आंदोलनासंदर्तभात एक मोठी बातमी समोर आली आहे, यामुळे अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा आधीच इशारा देण्यात आला होता. परंतु या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलनाला परवानगी नसतानाही हे आंदोलन करण्यात आलं आहे.
यानंतर आता मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. परवानगी नसताना देखील यांनी शिवाजी पार्कवर आंदोलन केलं. गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला. अभिजीत दिपके आणि त्यांच्या टीमची ही कृती बॉम्बे हायकोर्टाद्वारे देण्यात आलेल्या PIL 116/2009 नुसार 4 जानेवारी 2013 रोजी दिलेल्या निर्णायविरोधात तसेच महाराष्ट्र सरकारने त्यानंतर जारी केलेल्या आदेशाद्वारे लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या विसंगत आहे, असा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता अभिजित दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनाला शांततेच्या मार्गाने झालेलं आंदोलन म्हणता येणार नाही. आंदोलनाच्या नावाखाली आदेशाचं उल्लंघन झालं आहे. ज्या लोकांनी या आंदोलनात संविधानाच्या रक्षणाचा दावा केला, त्याच लोकांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे, असंही या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
काय आहेत सीजेपीच्या मागण्या?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, एसआयआर प्रकिया संपूर्णपणे रद्द करावी, तसेच 2025 च्या मतदार यादी प्रमाणेच 2029 च्या निवडणुका घ्याव्यात या सीजेपीच्या तीन प्रमुख मागण्या आहेत, त्यासाठी आज मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला परवानगी मिळालेली नव्हती.