
Mumbai Crime News: मायानगरी मुंबई अशा काही घटना घडतात, ज्या एखाद्या क्राईम सिनेमापेक्षा देखील धक्कादायक असतात. सर्वकाही सुरळीत सुरु असताना असा ट्विस्ट येतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यामध्ये संबंधित व्यक्तीची काही चूक देखील नसते.. आता देखील असंच काही घडलं आहे. रात्री रस्त्यावरून सुरु असलेला प्रवास कधी मृत्यात्या प्रवासात बदलतो कळत देखील नाही… 33 वर्षीय उबर ड्रायवर नासिर सलाम अहमद याने गुरुवारी रात्री बुकिंग स्वीकारली… पण त्याला कधीच कल्पना नव्हती की, ही राईड त्याची शेवटची राईड असणार आहे… पाच दिवस बेपत्त असल्याचं कळल्यानंतर नासिर याचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाट येथील निर्जन स्थळी आढळली. या प्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.
रिपोर्टनुसार, खळबळ तेव्हा माजली, जेव्हा रक्ताने माखलेल्या कारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेमुळे मुंबई महानगर प्रदेशातील कॅब चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिस तपासात असं दिसून आलं की, आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कॅब बुक केली होती. पण वाटेत जे घडले त्यामुळे एक कुटुंब कायमचं उद्ध्वस्त झालं आहे… विद्यार्थ्याचं नाव आदर्श असं आहे.
आदर्श हा आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. त्यासाठी चालक नासीर अन्सारी याने उबेर कार घेऊन आदर्शला पिकअप केले आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.गाडी पुण्यातील गणेश खिंड परिसरात पोहोचली असता चालक नासीर अन्सारी याने अचानक गाडी थांबवली. त्याने चाकूचा धाक दाखवत आदर्शकडे पैशांची मागणी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आदर्शने प्रतिकार केला. दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटापटीदरम्यान नासीरच्या हातातील चाकू आदर्शच्या हाती लागला आणि गोंधळातच तो नासीरच्या गळ्याला लागल्याने त्याचा गळा चिरला गेला. यात नासीरचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर घाबरलेल्या आदर्शने मृतदेह तिथेच टाकून उबेर कार घेऊन टिटवाळ्याकडे पलायन केले.
शुक्रवारी सकाळी टिटवाळा जवळील कल्याण-मुरबाड महामार्गावरील गोवेली गावाजवळ रक्ताच्या डागांसह एक मारुती एर्टिगा कॅब बेवारस अवस्थेत आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. कारमध्ये रक्ताचे डाग होते… ही माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिला… त्यानंतर पोलिसांची चौकशी सुरु झाली… पण तेव्हा कारच्या ड्रायव्हरबद्दल कोणतीच माहिती पोलिसांकडे नव्हती…
याच दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाट येथील गणेशखिंड परिसरातून एक मृतदेह ताब्यात घेण्यात आला… मृतदेहावर अनेक वार केलेले होते… अशात मृतदेह कार चालकाचा असेल… असा संशय पोलिसांनी व्यक्त केला… यानंतर ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने तपास अधिक तीव्र केला आणि कॅब बुकिंग रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचले.
चौकशी दरम्यान पोलिसांना अनेक ठोस पुरावे आढळले… सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रस्त्यात कारमध्ये एका पेट्रोल पंपवर फ्यूल भरताना देखील दिसला. डिजिटल रेकॉर्ड आणि मोबाईल डेटाच्या आधारे पोलिसांनी आरोपी आदर्श चंद्रकांत भेळराव याला टिटवाळा येथील त्याच्या घरातून अटक केली.
सध्या पोलीस पोस्टमार्टम आणि फॉरेंसिक रिपोटच्या प्रतिक्षेत आहेत… रिपोर्ट समोर आल्यानंतर कळेल की, ड्रायवरचा मृत्यू नक्की का झाला आहे… सांगायचं झालं तर, कथित आरोपी आदर्श याचा कार चालकाला मारण्याचा कोणताच हेतू नव्हता… पण गुन्हा घडला… आता याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.