AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतल्या कर्फ्यूमुळे पार्टीसाठी गावी निघाला असाल तर आधी वाचा ही बातमी!

मुंबईत 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. त्यामुळे अनेक लोक पार्टी करण्यासाठी ग्रामीण भागात निघाल्याचं समोर येत आहे.

मुंबईतल्या कर्फ्यूमुळे पार्टीसाठी गावी निघाला असाल तर आधी वाचा ही बातमी!
| Edited By: | Updated on: Dec 31, 2020 | 9:08 PM
Share

ठाणे : शहरामध्ये रात्रीचा कर्फू (curfew) लागल्यामुळे लोक पार्टिसाठी ग्रामीण भागाकडे वळू लागले आहेत. त्यासाठीच आजपासून ठाणे ग्रामीण भागामध्येही रात्री 11 ते सकाळी 6 कर्फू लावण्यात आला आहे अशी माहिती ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मुंबईत 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. त्यामुळे अनेक लोक पार्टी करण्यासाठी ग्रामीण भागात निघाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (mumbai curfew has been imposed Thane rural areas from 11 pm to 6 am)

नववर्षाच्या निमित्ताने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करु नये, असे आवाहन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. 31 डिसेंबरला रात्री दारू पिऊन गाडी चालवू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मुंबई पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यामुळे जर कोणी रस्त्यावर दारु पिऊन गाडी चालवली, तर त्याची थेट रुग्णालयात पाठवून ब्लड टेस्ट केली जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणेही यंदाही थर्टीफर्स्टसाठी वाहतूक पोलीस सज्ज असणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ब्रीथ एनलायझरने कोणत्याही चालकाची तपासणी केली जाणार नाही. पण जर पोलिसांना एखाद्यावर संशय आला, तर त्याची थेट रुग्णालयात रक्त तपासणी केली जाणार आहे. यावेळी जर त्याच्या रक्तात दारु आढळली तर त्या चालकासोबतच गाडीतील इतरांवरही कारवाई केली जाणार आहे.

दरवर्षी थर्टी फर्स्टच्या दिवशी ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवली जाते. यात ब्रीथ एनालायझरने कोणी मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर कोणी दारु पिऊन गाडी चालवत आहे, असा संशय वाहतूक पोलिसांना आला, तर पोलीस थेट त्या चालकाला रुग्णालयात पाठवणार आहे.

त्यानंतर त्या ठिकाणी चालकाची ब्लड टेस्ट करून मद्यपान केलं आहे की नाही, याची तपासणी होईल. जर रिपोर्टमध्ये तो मद्यपान केलेल्याचं समोर आलं, तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरी जावं लागेल. विशेष म्हणजे मद्यपान करुन गाडी चालवण्यावरच नाही तर गाडीत सोबत असलेल्यांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (mumbai curfew has been imposed Thane rural areas from 11 pm to 6 am)

संबंधित बातम्या – 

मुंबईकरांना मोठा दिलासा, थर्टी फर्स्टच्या रात्री ऑनलाईन फूड डिलिव्हरीची वेळ वाढवली

थर्टी फर्स्टला तळीरामांवर करडी नजर; दारू पिऊन गाडी चालवल्यास थेट रक्त तपासणी

Maharashtra Lockdown Extended | राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

(mumbai curfew has been imposed Thane rural areas from 11 pm to 6 am)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.