तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; FDA कडून हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; FDA कडून हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; FDA कडून हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस
| Updated on: Jul 31, 2026 | 2:11 PM

अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरू आहे. एफडीएकडून महाराष्ट्रात नामांकित हॉटेलवर कारवाईचा सुरू आहे. आता अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा सरकारी आस्थापनाकडे वळला आहे. हायकोर्टाने मंत्रालायाच्या कँटीनची पुन्हा तापसणी करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या नोटीसनंतर थेट हायकोर्टाच्या कँटीनला टाळ ठोकण्याची वेळ आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून कँटीनवर कारवाई केल्याने वकील वर्गात एकच खळबळ उडाली.

अन्न व औषध प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून खासगी आस्थापनावर कारवाईचा धडाका सुरू होता. त्यावरून एका सुनावणीदम्यान सरकारी आस्थापनावरील कँटीनबाबत विचारणा केली होती. त्यानंतर एफडीएच्या पथकाने हायकोर्टाच्या कँटीनला भेट दिली. त्यानंतर आज अन्न व औषध प्रशासनाने हायकोर्टाचे कँटीन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टातील कँटीन हे एफएसएसआय परवान्याशिवाय चालवले जात होते. त्यामुळे नियमांचे पालन करत नसल्याचे म्हणत अन्न व औषध प्रशासनाने कँटीन चालकाला व्यवसाय थांबवण्याचे आदेश दिले. अन्न व औषध प्रशासनाने कोर्टाच्या आवारातील 3 कँटीनला नोटीस दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नोटिशीत काय म्हटलंय?

अन्न व औषध प्रशासनाने कँटीनला पाठलेल्या नोटीसमध्ये म्हटलं की, ‘ हायकोर्टाच्या अस्थापनेतून कँटीनचा व्यवसाय करता. परंतु तुमची संस्था ही अन्न सुरक्षा व मानके कायदा चे कलम 3 (1) (ओ) अन्वये अन्न व्यावसायिक संज्ञेत मोडते. त्याकरिता अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंतर्गत परवाना किंवा नोंदणी घेणे आवश्यक आहे. कँटीन तपासणीत अन्न पदार्थांच्या उत्पादन/विक्रीकरिता आवश्यक परवाना असल्याचे आढळून आले नाहीत. तपासणीदरम्यान पेढीने अन्न सुरक्षा आणि मानके, नियमाच्या अनुसूची 4 भाग 1 मधील तरतुदींचं उल्लंघन केल्याचे आढळून आलं आहे. त्यामुळे आवश्यक परवाना प्राप्त करून घेईपर्यंत अन्न सुरक्षा आणि मानके, नियम २०११ अनुसूची ४ भाग १ मधील तरतुदींची पूर्तता करेपर्यंत सदर कँटीन सुरू करू नये, असे आदेश देण्यात येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई घेण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us