मुंबई लोकलमध्ये तरुणीला नको तिथे स्पर्श, विरोध केल्यानंतर लोकलखाली ढकललं, डावा हात कापला गेला

मुंबई लोकलमध्ये तरुणीसोबत भयंकर घटना घडली. एका नराधमाने भांडणानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याची घटना घडली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई लोकलमध्ये तरुणीला नको तिथे स्पर्श, विरोध केल्यानंतर लोकलखाली ढकललं, डावा हात कापला गेला
mumbai local
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 10:48 AM

बोरिवलीकडून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये भयंकर घडलं आहे. धावत्या लोकलमध्ये तरुणीसोबत छेडछाडीची घटना घडली. याला विरोध केल्यानंतर तिला नायगव रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनखाली ढकलल्याची भयंकर घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेत तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने कापला गेला. यामुळे तरुणाचा डावा हात कोपरापासून कापला गेलाय.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणीच्या माहितीनुसार, लोकल ट्रेन ही नायगाव स्टेशनला आली. त्याानंतर आरोपीने छातीजवळ हात लावत गैरवर्तन केले. या कृत्याने भडकलेल्या तरुणीने आरोपीला चप्पल मारली. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर आरोपीने तरुणीला दोन्ही हातांनी जोरदार धक्का दिला. त्यामुळे दोन डब्यांच्या मधून रेल्वे रुळावर पडली. यात तरुणीचा डावा हात कापला गेला. मालाडहून विरार लोकलने प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेचा भाईंदर ते नायगाव प्रवासात आरोपीने विनयभंग केला. या प्रकरणात  पोलिसांनी गुन्ह्यात योग्य कलमे लावली नसल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. त्यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली. मनसे विधानसभा प्रमुख सचिन पोपळे यांनी कुटुंबीयांसह वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी योग्य कलमे वाढवण्याची मागणी केली. त्याला पोलिसांनी होकार दिलाय.

Loading...

दरम्यान,  घटनेनंतर आरोपीने गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात 6 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 117(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी हत्याचा प्रयत्नाचे कलम लावण्यात आले नाही. त्यावरून कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात मनसे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर कलमे वाढवण्याची मागणी केली. या घटनेने लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

पीडित तरुणीने सांगितलं की, मी नायगावच्या दिशेने निघाले होते. त्यासाठी बोरिवलीहून ट्रेन पकडली. नायगाव स्टेशन येणार, तितक्यात एक व्यक्ती चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करत होते. त्यामुळे माझ्या भांडण झालं. त्यानंतर ट्रेनमधून खाली उतरले. त्यानंतर मी त्यांना शिवी दिली. तर त्यांनीही मला शिवीगाळ केली. नंतर त्याला चप्पल मारली. त्यानंतर या व्यक्तीने मला खाली ढकलून दिलं. मला न्याय हवाय. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय. माझ्या घरात सर्व काही सांभाळणारी एकटीच होती. मला न्याय हवाय. माझा एक हात निकामी झालाय. मी एक हाताने काहीच करू शकत नाही. माझ्या डोक्याला देखील मार लागला. यात माझ्या डोक्याला 16 टाके पडले. मला फक्त न्याय हवा हवाय..आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us