AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! संजय राऊत यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार; त्या एका कारणासाठी…

महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य आहे. परदेशी पाहुणे, उद्योजक, पर्यटक यांच्यासाठी नवी मुंबईत इंटरनॅशनल म्हणून जे उभं केलं ते सोयीचं नाही. बाहेर रंगरंगोटी चांगली आहे. पण आजूबाजूला काहीच सुविधा नाहीत. त्यामुळेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनसला पर्याय नाही. हे मुख्यमंत्र्यांना समजलं, त्याबद्दल आभारी आहे. असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.

मोठी बातमी ! संजय राऊत यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार; त्या एका कारणासाठी...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 10:43 AM
Share

मुंबईतून एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबई विमानतळाकडे हलवू नका, असं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाला लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला न हलवण्याची भूमिका घेतल्याबद्दल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. ही भूमिका घेतल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ अत्यंत अनावश्यक आहे, असं संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.

नवी मुंबई विमानतळाची उभारणी ज्या पद्धतीने झाली ती आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही. त्याची रचनाही धोकादायक आहे. मुंबईच्या बाहेर आंतरराष्ट्रीय विमानतळ नेणं हे मुंबईचं महत्त्व कमी करण्यासारखं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ गावाबाहेर असणं योग्य नाही. कुणाला तरी विमानतळाची जमीन हडप करायची आहे, कुणाचा तरी त्यावर डोळा आहे म्हणून ते करणं योग्य नव्हतं. एकेकाळी फडणवीसही नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कौतुक करत होते, असं संजय राऊत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा नकार

अरब राष्ट्रातील म्हणजे गल्फच्या बहुतेक विमान कंपन्यांनी नवी मुंबईत लँडिंग करण्यास नकार दिला आहे. युरोपच्या विमान कंपन्यांनीही लँडिंगला विरोध केला आहे. कारण सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळ धोकादायक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या विमानतळासाठी जमिनी गेल्या. घरंदारं गेली. पर्यावरणाचा ऱ्हास झाला. मग हा खटाटोप कुणाच्या मुर्खपणामुळे झाला हे बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

झोपड्यांचे पुनर्वसन करा

मुंबईचं विमानतळ मुंबईतच हवं. त्यात तुम्ही सुधारणा करू शकता. मुंबईच्या विमानतळाच्या परिसरात झोपड्यांचं जंगल झालं आहे. झोपड्या वाढल्या आहेत. त्यांचं योग्य पद्धतीने पुनर्वसन करा. आणि तो भाग विमानतळासाठी वाढवा. ते करायचं नाही. अख्ख विमानतळ उचलून नवी मुंबईत नेता? मी दोनदा नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा प्रयत्न केला. प्रचंड दमलो, थकलो, असंही त्यांनी सांगितलं.

सुबुद्धी सूचली, ईश्वराचे आभार

आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्साह लागतो तो नवी मुंबईत दिसत नाही. तिथे डोमॅस्टिक विमानेही उतरवू नये. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे प्राण महत्त्वाचे आणि डोमॅस्टिक प्रवाशांचे महत्त्वाचे नाही का? विमानतळावर भूमिगत मेट्रोतून तुम्ही मुख्य शहरात येऊ शकता. दिल्लीत अशी सुविधा आहे. नवी मुंबईत तशी सुविधाही नाही. तिथे बसेस नाही. टॅक्सी नाही. कंटेनर धूळ खात पडले आहेत. त्यातूनच मार्ग काढून जावं लागतं. याला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणत नाहीत. मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी सूचली त्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो, असंही ते म्हणाले. अदानी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. देशाचे पंतप्रधान नाहीत. आम्हाला महाराष्ट्राचा इंटरेस्ट जपला पाहिजे. महाराष्ट्राच्या उद्योग आणि गुंतवणूकदारांचा इंटरेस्ट जपला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणी; चिंता करण्याचं कारण नसल्याची माहिती
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!