Video: ‘तेच मूर्ख, तेच शहाणे’ आघाडी सरकारच्या कारभाराचे फडणवीसांकडून चपखल शब्दात वाभाडे !

| Updated on: Mar 24, 2022 | 5:40 PM

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा कारभार सध्याच्या घडीला कसा सुरु आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी सभागृहात (Maharashtra Assembly) दोन कविता सादर केल्या. सरकार नावाची यंत्रणा किती उदास झाली आहे आणि कशा प्रकारे लोकांच्या संदर्भात सरकारला काही देणं घेणं नाही. नवीन कल्पना नाहीत, योजना नाहीत, घोषणांची अंमलबजावणी नाहीये. सुरू असलेले प्रकल्प बंद पडलेले आहेत, तरीही सगळं सुरळीत सुरु आहे, असं म्हटलं जातंय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय

Video: तेच मूर्ख, तेच शहाणे आघाडी सरकारच्या कारभाराचे फडणवीसांकडून चपखल शब्दात वाभाडे !
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका
Image Credit source: विधानसभा
Follow us on

मुंबईः आम्ही जे म्हणून तेच खरं आहे, आमचा कारभार उत्तमच चालू आहे, अशी सध्याच्या सरकारची भावना आहे. त्यांना वास्तवाचं भान नाही. नागरिकांच्या प्रश्नांकडे पहायला वेळ नाही. केवळ टीका-आरोप-टोमणे यापलिकडे काही सुरु नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सरकारचे वाभाडे काढले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा कारभार सध्याच्या घडीला कसा सुरु आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी सभागृहात (Maharashtra Assembly) दोन कविता सादर केल्या. सरकार नावाची यंत्रणा किती उदास झाली आहे आणि कशा प्रकारे लोकांच्या संदर्भात सरकारला काही देणं घेणं नाही. नवीन कल्पना नाहीत, योजना नाहीत, घोषणांची अंमलबजावणी नाहीये. सुरू असलेले प्रकल्प बंद पडलेले आहेत, तरीही सगळं सुरळीत सुरु आहे, असं म्हटलं जातंय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कविवर्य विंदा करंदीकरण आणि हिंदीतील कवी पी. एल. बामनिया यांच्या दोन कविता त्यांनी सादर केल्या…

विंदांच्या कवितेप्रमाणे सध्याची स्थिती….

देवेंद्र फडणवीस यांनी विंदा करंदीकर यांच्या कवितेचा आधार घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सरकारचा कारभार किती कंटाळवाणा झालाय, त्यात काहीही नवं नाही, असं या कवितेत म्हटलंय ती कविता अशी-

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
माकडछाप दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन
तीच गाडी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहिल्या,
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं
काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार
सुख थोडे आणि दुःख फार

तुम चाहों तो तबेलों को बाजार कहदो….

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना फडणवीस यांनी हिंदी कवी पी. एल. बामनिया यांच्या कवितेचा आधार घेतला. मी म्हणेल तीच पूर्व दिशा, अशा स्वरुपाचं धोरण सरकारनं आखलंय, असा सूर त्यातून व्यक्त केला आहे. ही कविता अशी-

तुम चाहों तबेलों को बाजार कह दो
पतझडों का बहार कह दो
तुम्हाराही राज है अब यहाँ पर
तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो
छुट्टी का दिन बितने लगा यहीं पर
अपने दफ्तर को तुम घरबार कह दों
इसी पर मिलने लगी हर खबर,
अपने मोबाइल को अखबार कहदो
तुम्हारी इस सहुलियत भरी जिंदगी में
मुसिबत खडी करदे, उसे सरकार कह दों
फर्जी डिग्रीया बहोत लेली लोगों ने
तुम चाहो तो पढे लिखों को गवार कह दो

इतर बातम्या-

Devendra Fadnavis : क्लास बंद, ग्लास सुरु, फडणवीसांनी महाविकास आघाडीचा तीन नावात निकाल लावला, ठाकरे-पवारांच्या जिव्हारी?

Crime : D Pharmaमध्ये प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक, शिक्षकाला बेड्या