AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border 2 Review: कसा आहे सनी देओलचा ‘बॉर्डर 2’? पहिला रिव्ह्यू समोर, स्टार्स पाहून व्हाल थक्क!

Border 2 Review: सनी देओलचा वॉर ड्रामा 'बॉर्डर 2' थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच तुफान चर्चेत आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने या चित्रपटाला किती स्टार दिले आणि हा चित्रपट एकंदरीत कसा आहे, त्याबद्दल सविस्तर वाचा..

Border 2 Review: कसा आहे सनी देओलचा 'बॉर्डर 2'? पहिला रिव्ह्यू समोर, स्टार्स पाहून व्हाल थक्क!
Border 2 Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2026 | 10:03 AM
Share

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या सुपरहिट चित्रपटाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सीक्वेल ‘बॉर्डर 2’ नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. या पहिल्यावहिल्या रिव्ह्यूमध्येच ‘बॉर्डर 2’ला ब्लॉकबस्टर असं म्हटलं गेलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी ‘बॉर्डर 2’ला 5 पैकी 4.5 स्टार दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच जबरदस्त असणार, असं नेटकरी म्हणत आहेत.

तरण आदर्शने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘बॉर्डर 2 हा चित्रपट तुमचं हृदय अभिमानाने भरून टाकणारा आहे. हा चित्रपट देशाला तसंच सशस्त्र दलांना सलाम करतो. थिएटरमध्ये आवर्जून पहावा असा चित्रपट. दिग्दर्शक अनुराग सिंहने अत्यंत दमदार पद्धतीने आणि भावनिकदृष्ट्या ही युद्धकथा सादर केली आहे. ‘बॉर्डर’चा स्तर, प्रामाणिकपणा आणि आत्मा यात खऱ्या अर्थाने उतरला आहे. त्याचसोबत हा चित्रपट कल्ट क्लासिक ‘बॉर्डर’च्या वारशाचा आदर करतो. या चित्रपटातील साहसदृश्ये फक्त दिखाव्यासाठी नाहीत. तर कथा आणि भूमिकांच्या भावनांना पुढे नेण्यात ही दृश्ये मदत करतात.’

तरण आदर्श यांनी त्यांच्या रिव्ह्यूमध्ये ‘बॉर्डर 2’मधील डायलॉग आणि संगीताचीही प्रशंसा केली आहे. ‘यातील संवाद धारदार, मनाला भिडणारे आणि देशभक्तीपूर्ण आहेत. यामध्ये असे अनेक पंचलाइन्स आहेत, ज्यांवर थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. त्याचसोबत ‘घर कब आओगे’ आणि ‘जाते हुए लम्हों’ या दोन गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन डोळ्यांत पाणी आणतात. अभिनेत्यांबद्दल बोलायचं झाल्यास, सनी देओल या चित्रपटाचं हृदय आहे. तो अक्षरश: डरकाळी फोडताना दिसतोय. तर वरुण धवन हा या चित्रपटातील सर्वांत मोठा सरप्राइज ठरणार आहे. चांगलं लेखन आणि दिग्दर्शक यांच्या जोरावर वरुणने त्याची भूमिका अत्यंत चोख साकारली आहे. दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांनीसुद्धा त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.’

‘बॉर्डर 2’ने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपये कमावले होते. परंतु आता माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी तगडं होऊ शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने प्रेक्षक थिएटरमध्ये आणखी गर्दी करू शकतात.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!