स्कॉर्पिओ सोयीची नाही, इनोव्हा क्रिस्टा हवी… अवघ्या सहा महिन्यात नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव; मुंबई महापालिकेचा प्रताप
मुंबई महापालिके संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेत सहा महिन्यातचं नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव आला आहे. स्कोर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याने इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

मुंबई महापालिके संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेत सहा महिन्यातचं नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव आला आहे. स्कोर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याने इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी आणखी महागड्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात पालिकेकडून स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
महापालिकेत निवडणुकीनंतर नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी देण्यात आली आहे. उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ वाहने देण्यात आली आहेत. मात्र, स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचे नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे.
माजी महपौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
आता यावर माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी एक विधान केले आहे, “मी याबाबत दोन तीन गोष्टीवर प्रकाश टाकेन. यामध्ये 54 गाड्या घेतल्या. काही गाड्या वार्ड अध्यक्ष यांना दिल्या. आयुक्त यांना देखील गाड्या यातील दिल्या आहेत. आम्हाला ज्या गाड्या दिल्या तीच एव्हरेज 7-8 आहे. गाडी बरोबर नाही पाठ दुखते असं काहीजण म्हणतायत. गाडी मुंबईच्या बाहेर न्यायची असते तेव्हा आयुक्त यांची परवानगी लागते. मी महापौर असताना दोन वेळा गाडी बाहेर घेऊन गेली होती आताही मी बाहेर गाडी घेऊन जात नाही. अशा पद्धतीने पालिकेची लूटमार करत असतील तर योग्य नाही. आयुक्त हे काय यांचे लाड पुरवायला बसले आहेत का?”
“महापौर यांची प्रायव्हेट सेक्रेटरी यांना 50 हजार दिले जातंय. नगरसेवकांना मात्र 25 हजार मानधन दिल जातंय. हे काम करताना आम्हाला विश्वासात देखील घेतलं जात नाही. प्रस्ताव पुढे वरवर बोललं जातंय चुकीच्या प्रश्नावर आमचं नाव पूढे घेतलं जातंय. आपण या गाड्या पाच वर्ष वापरूया ना. ही मला गाडी comfort आहे, स्कॉर्पिओचं नाव घेऊन त्याचं मार्केट बदनाम करण्याच काम करतायत का? इलेक्शन व्हायच्या अगोदर या गाड्या खरेदी केल्या होत्या. स्कॉर्पिओ कंपनीचं डाउन करायच असेल. प्रसिद्धीसाठी तीन महिन्याला 10 लाख, खाजगी PA ला 50 हजार महिन्याला दिले जातायत. यांच नक्की काम कसलं चाललंय. जे अगोदर महापौर काम करायच ते आताचे महापौर करतायत पण मानधन एवढं? मी महापौर असताना माझ्या माणसांना असा पगार देत नव्हतो आवड आणि शिकायला मिळायचं म्हणून माझ्या माणस सोबत असायची” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.