अभिजीत दिपकेंना मुंबई पोलिसांचा मोठा धक्का, मोठी बातमी समोर, वातावरण तापणार
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईमध्ये दोन ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पोलिसांना पत्र देखील देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आत मोठी बातमी समोर येत आहे.

सध्या निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षांकडून काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वातावरण तापलं असतानाच आता या प्रकरणात कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने देखील उडली घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा देखील कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला होता. 2 ऑक्टोबर 2026 रोजी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार होतं. यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुंबई पोलिसांना परवानगीसाठी पत्रही देण्यात आलं. आम्ही संविधानाला अनुरूप आणि शांतिपूर्ण आंदोलन करू असं या पत्रात म्हटलं होतं. कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संगठन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी हे पत्र मुंबई पोलिसांना दिलं होतं.
परंतु आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीला पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दोन ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये जे आंदोलन करण्यात येणार होतं, त्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. हा सीजेपीसाठी मोठा झटका मानला जात आहे. याबाबत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मात्र आम्हाला जर विरोध प्रदर्शनाचा अधिकार नाकारण्यात आला तर आम्ही गांधी जयंतीच्या दिवशी जेल भरो आंदोलन करू, असा इशारा यावर आता अभिजीत दिपके यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाला मी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता नाही. परंतु देशातील आणि निवडणूक प्रक्रियेतील उत्तरदायित्व सुधारण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, असं या आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नकारल्यामुळे कॉकरोच जनता पार्टी काय भूमिका घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.