मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास आता 1 तासात, अखेर विमान सेवा सुरू, तिकीट दर किती असणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास आता 1 तासात होणार आहे. कारण विमान सेवा सुरू झाली आहे. या विमानसेवेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास आता 1 तासात, अखेर विमान सेवा सुरू, तिकीट दर किती असणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
plane
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 9:25 AM

मुंबईतून कोकण प्रवास आता जलद होणार आहे. एक्स्प्रेस ट्रेनच्या गर्दीत धक्के न खाता विमानाने प्रवास करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. विमानसेवा सुरू झाल्याने आता तळकोकणात जाण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करण्याची गरज नाही. मुंबईतून सिंधुदुर्गात एका तासात पोहोचता येणार आहे. कारण नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान नियमित विमानसेवा सुरू होतेय. या विमानसेवेमुळे कोकणवासीयांचा वेळेची बचत होणार आहे. या प्रवासाचे तिकीटदर देखील परवडणारे आहेत.

नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवेमुळे कोकणवासींना मोठा फायदा होणार आहे. तर या सेवेमुळे पर्यटक देखील सिंधुदुर्गात जाऊ शकतात. ही सेवा सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. ही सेवा सुरू झाल्यानंतर ही विमान सेवा नियमित सुरू राहावी. त्यानंतर कोणत्याही कारणाने खंडित होऊ नये, अशी साधी अपेक्षा कोकणवासीयांनी व्यक्त केली.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us