मुस्लिमाची जागा; बंगाली कलाकार; मूर्ती शिवरायांची

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक मूर्ती आजवर आपण बघितल्या असतील, पण आता पुढे आपल्याला कधी महाराजांची कापडी मूर्ती दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, मुंबईत आता शिवरायांची 8 फुटी कापडी मूर्ती तयार केली जात आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती साकारणारी व्यक्ती मराठी नसून पश्चिम बंगालची आहे. त्याच्या या कार्यात मुंबईतील एक मुस्लीम […]

मुस्लिमाची जागा; बंगाली कलाकार; मूर्ती शिवरायांची
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक मूर्ती आजवर आपण बघितल्या असतील, पण आता पुढे आपल्याला कधी महाराजांची कापडी मूर्ती दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, मुंबईत आता शिवरायांची 8 फुटी कापडी मूर्ती तयार केली जात आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती साकारणारी व्यक्ती मराठी नसून पश्चिम बंगालची आहे. त्याच्या या कार्यात मुंबईतील एक मुस्लीम व्यक्ती त्याला मदत करत आहे.

बंगाली कलाकार विश्वजित दास हे जूट कापडापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारून एक आगळीवेगळी मानवंदना देत आहेत. सध्या या कलाकृतीचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या 20 दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होईल. नालासोपारा येथे ही मूर्ती साकारली जात आहे.

मूळचे कोलकाता येथील असलेले दास हे गेल्या 2 वर्षांपासून अहोरात्र झटत ज्यूटपासून महाराजांची कलाकृती तयार करत आहेत. महाराजांची त्यांनी घडवलेली ही मूर्ती बघून दास यांच्या  बारीक कामाचा अंदाज येतो. ही कलाकृती तयार करण्यासाठी 80 मीटर कापड वापरण्यात येत आहे.

आपल्याला अवगत कला जगाला दाखवता यावी यासाठी दास आणि त्यांचा छोटा भाऊ राज हे 2016ला कोलकात्याहून मुंबईला आले. सुरुवातीला ते चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठासमोरील फूटपाथवर राहिले. मुंबईत आल्यावर काय तयार करायचे, याचा विचार सुरू केला. दास यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी जाणून घेतली आणि महाराजांची कलाकृती तयार करण्याचे ठरवले.

कलाकृती तयार करायला सुरुवात केली. एक दिवस मूर्ती तयार करत असताना अचानक पाऊस आला आणि मूर्ती भिजू लागली. तेव्हा तेथील पाणी विक्रेते अन्सारी हे त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी दास यांना नालासोपारा येथील एका घरात जागा दिली. 2 वर्षांपासून या कलाकृतीचे काम सुरू असून याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

दास हे अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित :

40 वर्षीय विश्वजीत दास हे पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण 10 वीपर्यंत झाले आहे. तांदळावर चित्र, नाव कोरणे, केसांपासून कलाकृती तयार करणे, पशु पक्षी यांच्या केस, पंखापासून वेगळी कलाकृती तयार करण्याचे काम त्यांनी केले. त्यांना प. बंगालमध्ये अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.