MPSC Exam: ‘गट ब’ च्या परीक्षेतील 8 प्रश्न आयोगाकडून रद्द, तर 3 प्रश्न बदलले;नुकसानीला जबाबदार कोण?

एमपीएससी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आज प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र आयोगाची ही उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाकडून या उत्तरतालिकामधील 8 प्रश्न रद्द केले असून त्यातील 3 प्रश्न बदलून देण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

MPSC Exam: गट ब च्या परीक्षेतील 8 प्रश्न आयोगाकडून रद्द, तर 3 प्रश्न बदलले;नुकसानीला जबाबदार कोण?
UPSC पाठोपाठ MPSCचा निकाल
Image Credit source: twitter
| Updated on: May 06, 2022 | 6:34 PM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षांचा फटका परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसत आहे. कधी नियम बदलतात, तर कधी न्यायालयीन कचट्यात परीक्षा सापडते या सगळ्या भोंगळ कारभारचा फटका मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसत आहे. आताही एमपीएससी आयोगाच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब (Group B) साठी 1 हजार पदांसाठी ही भरती काढली होती. त्या परीक्षेत आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.


उत्तरतालिकामधील 8 प्रश्न रद्द

एमपीएससी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आज प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र आयोगाची ही उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाकडून या उत्तरतालिकामधील 8 प्रश्न रद्द केले असून त्यातील 3 प्रश्न बदलून देण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

गुण कमी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून हा आठ प्रश्न रद्द केल्याचे सांगण्यात आले असले तरी त्याचा खरा फटका हा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार असून गुण कमी होणार असल्याने परीक्षार्थींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आधीच स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान

कोरोनाच्या महामारीमुळे आधीच स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना आयोग जर आपल्या चुकांचे खापर विद्यार्थ्यांवर फोडत असेल तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवालही परीक्षा देणारे विद्यार्थी विचारत आहेत.