
मुंबई : “ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत. महापौर, लोकप्रतिनिधी, नगसेवक नाहीत, तिथे घोटाळा सुरु आहे. तोच मी समोर आणला. रस्त्यांच्या विषयात केवळ घोटाळाच आहे. खोके सरकारने दुसरं काही केलेलं नाहीय” असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय. “पाच कॉन्ट्रॅक्टर्सना पॅकेट कॉन्ट्रॅक्ट दिलेत. CMO त कोणाला पाकिट दिली माहिती नाही. या सगळ्या पॅकेट कॉन्ट्रॅक्टर्सपैकी एकाला टर्मिनेशनची नोटीस आली होती. त्याची मुदत 26 ऑक्टोबरला संपली” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “या कॉन्ट्रॅक्टरने टर्मिनेशन नोटीसला उत्तर दिलय. आठवड्याभरात त्याची BMC मध्ये सुनावणी होईल. मुंबई महापालिकेत सुनावणी होणार आहे, विधानभवनात हा विषय चर्चेत आलेला. चौकशीत काय होणार? यावर आमच लक्ष आहे. याच आठवड्यात सुनावणी घेणार का? खोके सरकार कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट करुन ब्लॅकलिस्ट करणार की, सेटलमेंट करणार?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
“दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला 1000 कोटीची काम दिली. त्या कॉन्ट्रॅक्टरचा चिपळूनमधला पूल पडला. त्याची चौकशी झाली का? त्याच्यावर काही कारवाई होणार असेल तर मुंबईच्या कामाच काय? हा प्रश्न उपस्थित होतो” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “मुंबईत रस्त्यांची काम 1 ऑक्टोबर ते 31 मे या कालावधीत होतात. 2021-22 मध्ये अडीच हजार कोटींची काम मंजूर केलेली. 24 ते 36 महिन्यात एकातरी कामाला सुरुवात झाली आहे का? अडीच हजार कोटींची काम अशीच पडून आहेत. 21-22 ची अजून सुरु झालेली नाहीत” याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधलं.
मुंबईत किती हजार कोटींची काम पडून ?
“खोके सरकारमध्ये कंत्राटदाराचे लाड चालेल आहेत. बाकी काही नाही. मुंबईत साडेआठ हजार कोटींची काम अशीच्या अशी पडलेली आहेत. वाहतूक पोलिसांच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत किंवा परवानगी देऊ नका असं सांगितलेलं आहे, 31 मे पर्यंत कुठली काम पूर्ण होणार आहेत?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.