‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील जनरल डायर कोण?’, आदित्य ठाकरे यांचा तिखट सवाल

आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आज सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेची तुलना थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील जनरल डायर कोण?, आदित्य ठाकरे यांचा तिखट सवाल
aaditya thackeray and eknath shinde
| Updated on: Sep 06, 2023 | 4:19 PM

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : जालियनवाली बाग हत्यांकाड सर्वश्रूत असं आहे. पंजाबच्या अमृतर येतील सूवर्ण मंदिर येथे जो रक्तपात झाला होता तो फार भीषण होता. या हत्यांकाडात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आक्रोशाचा आवाज आजही विविध घटनांमधून गुंजताना दिसतो. ब्रिटशांच्या ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याच्या आदेशाने शेकडो भारतीयांवर त्यावेळी गोळीबार करण्यात आला होता. याच घटनेची तुलना आज ठाकरे गटाकडून जालन्यातल्या लाठीचार्जशी केली जातेय. जालन्यात 1 सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये शंभर पेक्षा जास्त गावकरी जखमी झाल्याची चर्चा आहे.

जालन्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांच्या राजभवन येथे जावून भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे जालन्याच्या प्रकारावरुन राज्य सरकारची तक्रार केली. त्यानंतर या शिष्टमंडळाने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला.

‘खरे जनरल डायर कोण आहे?’

“आपल्या राज्यात एक घटनाबाह्य, गद्दार मुख्यमंत्री आण दोन उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहे? ज्यांनी हे आदेश दिले. आदेश कोणी दिले हे लोकांसमोर आलं पाहिजे. कारण आता चौकशी समिती बसवली जाईल, जशी खारघरमध्ये बसवली आहे. त्या चौकशी अहवाल अद्याप आला नाही. अहवाल येईल तेव्हा एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला दोषी ठरवलं जाईल आणि बडतर्फ केलं जाईल”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी आज केला.

“ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होईल. ज्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटलो. त्यांच्याकडून पुढे कारवाई होईल, अळी अपेक्षा आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्रींनी थोडी लाज असेल तर राजीनामा द्यावा”, अशा तिखट शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राजीनाम्याची मागणी केली.

“अशा आंदोलनावेळी लाठीचार्ज झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडून आदेश घेतला जातो. पण आता ते आम्ही आदेश दिलेच नाहीत, असं सांगत आहेत. मग सरकार चाललंय कसं? मी राज्यपालांना विनंती केली की, मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांना बोलून समज द्यावी”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.