AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत देणार अमेरिकेच्या हातावर तुरी, भारत अमेरिका व्यापार करारावर अत्यंत मोठे अपडेट, तो निर्णय..

भारत आणि अमेरिकेतील संबंध आता पुन्हा एकदा तणावात आल्याचे बघायला मिळतंय. भारताला मोठा धक्का अमेरिकेकडून देण्यात आला. ज्याचा परिणाम आता दोन्ही देशांच्या व्यापार करारावर होऊ शकतो.

भारत देणार अमेरिकेच्या हातावर तुरी, भारत अमेरिका व्यापार करारावर अत्यंत मोठे अपडेट, तो निर्णय..
India and America
| Updated on: Feb 25, 2026 | 1:30 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिका व्यापार करारादरम्यान भारताला अत्यंत मोठा धक्का दिला. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय बाजार आपल्या हातात हवा. व्यापार कराराकरिता भारतावर प्रचंड दबाव अमेरिकेचा होता. शेवटी दोन्ही देशातील व्यापार करार पूर्ण झाली असून अंतिम टप्प्यात तांत्रिक काम सुरू आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या व्यापार कराराबद्दल घोषणा होईल. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारानंतर भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे वारंवार सांगितले जात आहे. भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला. व्यापार करारादरम्यान हा टॅरिफ कमी करून 18 टक्क्यांवर आणला. भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिताही अमेरिकेचा भारतावर अत्यंत मोठा दबाव होता. यादरम्यानच भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारत असताना पुन्हा एकदा भारताला अमेरिकेने दणका दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कदायक निर्णय घेत थेट भारतातून होणाऱ्या सौरऊर्जेच्या आयातीवर तब्बल 126 टक्के टॅरिफ लादण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. म्हणजे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सोलर पॅनेलवर आता तब्बल 126 टक्के टॅरिफ लागणार आहे. इतका मोठा टॅरिफ असल्याने भारतातून अमेरिकेत सोलर पॅनेल पाठवणे उत्पादकांना अजिबात परवडणारे नाही.

या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील सुरू असलेल्या व्यापार कराराला धोका निर्माण होऊ शकतो. कारण भारतावरील टॅरिफ कमी केल्यानेच भारतानेही व्यापार करार पुढे नेले. मात्र, अमेरिकेकडून एक एक करून भारताच्या काही वस्तूंवर मोठा टॅरिफ लावला जात आहे. ज्यानंतर त्या गोष्टी अमेरिकेच्या बाजारपेठेपर्यंत अजिबात पोहोचू शकत नाहीत.

ही अमेरिकेची चाल असल्याचे बोलले जात आहे. मार्चमध्ये व्यापार करारावर सह्या झाल्यानंतरही अमेरिका अशी धक्कादायक निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. यावर आता भारत नक्की काय भूमिका घेतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. भारताच्या सोलरवर टॅरिफ लावण्याचे एक वेगळे कारण तसे अमेरिकेकडून देण्यात आले.  भारताने अमेरिकेवर विश्वास ठेवून चूक केल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...