AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही बोलणं टाळा… डॉक्टरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला; ट्विटमध्ये काय म्हटलं?

Supriya Sule Voice Rest : सुप्रिया सुळे या पुढील काही काळ भाषणे, मुलाखतींपासून दूर राहणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

तुम्ही बोलणं टाळा... डॉक्टरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला; ट्विटमध्ये काय म्हटलं?
Supriya Sule Voice RestImage Credit source: Google
| Updated on: Jul 18, 2026 | 4:06 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. घशात सूज आल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे या पुढील काही काळ भाषणे, मुलाखतींपासून दूर राहणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

सुप्रिया सुळे यांना आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला

खासदार सुप्रिया सुळे या नेहमी आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात, मात्र आता त्या काही काळ मीडियापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यांना डॉक्टरांनी आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ‘आज मी घसा आणि आवाजाच्या तपासणीसाठी डॉ. मिलिंद किर्तणे यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे सांगितले असून, आवाजाला पूर्णपणे विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. आता मी व्हॉईस थेरपी घेणार असून, पुढील एक ते दोन आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहे. सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.’

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

काल सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर जाऊन सोमन वांगचूक आणि अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. याबाबत ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, ‘आज मी जंतर-मंतर येथे जाऊन सोनम वांगचुक आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सोनमजींच्या प्रकृतीबद्दल मला गंभीर चिंता वाटत असून, देशाला त्यांच्या आवाजाची आणि नेतृत्वाची गरज असल्यामुळे त्यांनी आपले उपोषण समाप्त करावे, अशी मी त्यांना विनंती केली.’

पुढे आपल्या पोस्टमध्ये सुळे यांनी म्हटले की, ‘हे कोणतेही राजकीय आंदोलन नाही. हा आपल्या तरुणांच्या भवितव्याचा आणि NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सरकारने अद्याप विद्यार्थ्यांशी कोणताही अर्थपूर्ण संवाद सुरू केलेला नाही. लोकशाहीमध्ये सत्तेची प्रतिक्रिया ही संवेदनशीलतेने असावी, मौनाने नव्हे. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करणाऱ्या सोनमजी आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांच्या चिंता प्रामाणिकपणे ऐकल्या जाव्यात आणि त्यांचे निराकरण करुणा, न्याय व निष्पक्षतेने व्हावे. या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. देशातील तरुणांचा आवाज ऐकला जाईपर्यंत मी हा मुद्दा संसदेत आणि प्रत्येक योग्य व्यासपीठावर सातत्याने मांडत राहीन.’

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक