अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं; अंगावर काटा आणणारी घटना
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात उंब्रजजवळ असलेल्या इंदोली फाटा परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत मसूर परिसरातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधितांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 2 गोळ्या जखमीच्या दोन्ही पायात लागल्याचे सांगितले जात आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमागे मित्रांमधील पैशाच्या व्यवहाराचा वाद कारणीभूत आहे की भाईगिरीशी संबंधित गटांतील वाद, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणत्याही कारणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
Published on: Jul 18, 2026 02:20 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन