AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!

उद्धव ठाकरे यांच्या नागपूरमधील रामरक्षा पठणाला प्रत्युत्तर म्हणून भाजपा नेत्या नवनीत राणा अमरावतीमधील हनुमान गढी येथे हनुमान चालीसा पठण करणार आहेत.

ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!
navneet rana and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 3:10 PM
Share

Uddhav Thackeray Protest : अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ठाकरे गटाकडून राज्यभरात रामरक्षा आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित राहात आहेत. मुंबईनंतर नागपूरमध्येही हे रामरक्षा आंदोलन होणार आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपानेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत.

नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालिसाचे पठण

उद्धव ठाकरे यांच्या नागपूरमधील रामरक्षा पठणाला प्रत्युत्तर म्हणून भाजपा नेत्या नवनीत राणा अमरावतीमधील हनुमान गढी येथे हनुमान चालीसा पठण करणार आहेत. हनुमान गढी येथे हनुमान चालिसा पठणाची भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्याकडून जय्यत तयारी केली जात आहे. नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अमरावतीमध्ये आम्ही सुंदरकांडचे आयोजन केले

भाजपाचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार प्रविण पोटे यांनीदेखील ठाकरेंच्या या आंदोलनावर टीका करत हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षाचं पठण करणार आहेत. लोक त्यांना भीक घालत नाहीत म्हणून त्यांना रामरक्षाची आठवण आली. अमरावतीमध्ये आम्ही सुंदरकांडचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे यांना देव सुबुद्धी देवो. त्यांनी प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी जाण टाळलं. फक्त आपल्याला सत्ता मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी ते काम केलं होतं, अशी घणाघात टीका प्रविण पोटे यांनी केली.

संजय राऊत यांचे मोहन भागवत यांना पत्र

दरम्यान, मुंबईत झालेल्या रामरक्षा आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भर पावसात हजेरी लावली होती. त्या आंदोलनात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता हेच आंदोलन नागपुरात होत आहे. खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनादेखील या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता या आंदोनात नेमकं काय काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच