AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?

Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?

| Updated on: Jul 18, 2026 | 1:53 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर धमकी दिल्याचा दावा समोर आला असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खाननंतर आता आमिर खानही बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्ट आणि कथित ऑडिओ क्लिपद्वारे आमिर खानला धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे

बॉलिवूड अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर धमकी दिल्याचा दावा समोर आला असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खाननंतर आता आमिर खानही बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्ट आणि कथित ऑडिओ क्लिपद्वारे आमिर खानला धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या अर्जू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाने दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

व्हायरल पोस्टमध्ये आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याच कारणामुळे त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये आमिर खानविरोधात आक्षेपार्ह आणि धमकीची भाषा वापरण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि कथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात अभिनेता आमिर खान किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच तपास यंत्रणांनीही या धमकीच्या दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नसून, संपूर्ण प्रकरणाची पडताळणी सुरू आहे.

Published on: Jul 18, 2026 01:53 PM

Follow Us