AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ

भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ

| Updated on: Jul 18, 2026 | 12:54 PM
Share

भारतीय अवकाश क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेसने भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 यशस्वीरित्या प्रक्षेपित करून नवा टप्पा गाठला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून शनिवारी सकाळी 11.30 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले.

भारतीय अवकाश क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेसने भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 यशस्वीरित्या प्रक्षेपित करून नवा टप्पा गाठला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून शनिवारी सकाळी 11.30 वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. या मोहिमेला ‘आगमन’ असे नाव देण्यात आले असून रॉकेटने नियोजित सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर उपग्रह निर्धारित कक्षेत स्थापित करण्यात आला. संपूर्ण प्रक्षेपण प्रक्रियेवर ISROच्या वैज्ञानिकांनी बारकाईने लक्ष ठेवले.

हे यश केवळ स्कायरूट एअरोस्पेससाठीच नाही, तर भारतातील खासगी अवकाश उद्योगासाठीही मोठे पाऊल मानले जात आहे. 2020 मध्ये केंद्र सरकारने अवकाश क्षेत्रात खासगी कंपन्यांना संधी देणारे महत्त्वाचे बदल केले. त्यानंतर अनेक भारतीय कंपन्यांनी रॉकेट आणि उपग्रह तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवली. स्कायरूट एअरोस्पेसने यापूर्वी 2022 मध्ये विक्रम-S हे सब-ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले होते. मात्र त्या मोहिमेत उपग्रह कक्षेत पाठवण्यात आला नव्हता. आता विक्रम-1च्या माध्यमातून अनेक ग्राहकांचे छोटे उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 450 किलोमीटर उंचीवरील लो-अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आले. या यशामुळे भारताच्या खासगी अवकाश उद्योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 18, 2026 12:53 PM

Follow Us