AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढील 7 दिवस या राशींसाठी कमाईचा परफेक्ट योग

Baba Vanga Prediction Weekly Lucky Rashifal 2026: बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार पुढील आठवड्यात 20 ते 26 जुलै दरम्यान या पाच राशींसाठी कमाईचाच नाही तर संधीचा नवीन परफेक्ट योग जुळून येणार आहे. कोणत्या आहे त्या पाच राशी?

Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढील 7 दिवस या राशींसाठी कमाईचा परफेक्ट योग
बाबा वेंगाची भविष्यवाणी
| Updated on: Jul 18, 2026 | 3:58 PM
Share

Baba Vanga Weekly Horoscope 2026: बाबा वेंगाची भविष्यवाणी जगभरात चर्चेत आहे. ज्योतिष मान्यता आणि प्रचलित दाव्यांनुसार, पुढील आठवड्यात 20 ते 26 जुलै या दरम्यान, मिथुन, कन्या, धनुसह पाच राशींचे नशीब उघडणार आहे. या राशींना नोकरीतही मोठी संधी मिळेल. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडून येतील. कोणत्या आहेत त्या लकी राशी?

मिथुन रास: नवीन संधी दारात

बाबा वेंगानुसार, मिथुन राशीसाठी 20 ते 26 जुलै हा कालावधी नवीन संधी घेऊन येणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. अनेक बड्या लोकांशी तुमची ओळख होईल आणि त्याचा फायदा होईल. या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून नोकरीत लाभ होईल. व्यावसायिक, व्यापाऱ्यांना नवीन लाभदायक घटना घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. या राशीचे लोक खर्च करायला हात आखडता घेणार नाहीत.

कन्या रास: मेहनतीला फळ

गेल्या एक वर्षांपासून मेहनत, कष्टामुळे कन्या राशीचे लोक थकून गेले होते. त्यांच्यासाठी आता आनंदवार्ता धडकणार आहे. त्यांच्या कष्टायचे चीज होईल. नवीन संधी मिळतील. पदोन्नतीची शक्यता आहे. वाहन आणि घर खरेदीचा योग जुळून येईल. कार्यक्षेत्रात अनेक नवीन बदल होतील. मन आनंदी असेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मानसिक त्रासातून सुटका होईल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील सदस्याकडून आनंदवार्ता कळेल.

धनु रास: पै-पाहुण्यांनी घर गजबजणार

बाबा वेंगानुसार, धनु राशीच्या लोकांचा पुढील आठवड्यात आनंद द्विगुणीत होईल. एखाद्या बातमीमुळे हायसे वाटेल. मनावरील ताण कमी होईल. आर्थिक कामं मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल . घरात पै-पाहुणे येतील. आनंदाचे वातावरण असेल. नवीन नोकरी अथवा व्यवसायासाठी हा कालावधी अनुकूल आहे. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. मित्र मदतीला धावून येईल.

कुंभ रास: नाते वृद्धिंगत होईल

कुंभ राशीला शनिची पीडा सतावणार नाही. जीवनात या काळात अनेक धडे तुम्ही गिरवणार आहात. पुढील आठवड्यात सरकारी नोकरीतील आनंदवार्ता येऊन धडकेल. पदोन्नती, पक्की नोकरीची वार्ता ऐकून मन भारावून जाईल. लग्नाची चर्चा पुढे सरकेल. मानसिक तणाव कमी होईल. आत्मविश्वास वाढेल. कार्यालयात वातावरण हलके फुलके असेल. गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मीन रास: उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील

बाबा वेंगाच्या भाष्यानुसार, 20 ते 26 जुलै या कालावधीत अनेक सुखद धक्के बसतील. जो विचारच सोडून दिला होता, ती कामं सहज होतील. विस्मरणात गेलेल्या व्यक्ती अचानक मदतीला धावतील. नोकरीचे नवीन प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. दूरच्या प्रवासाचे योग निर्माण होत आहे. कोर्टकचेरीच्या कटकटीतून एकदाची मुक्ती मिळेल. आठवड्याच्या मध्यात घरी मिठाईचा डब्बा घेऊन जायला विसरू नका.

(डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही केवळ माहिती म्हणून देण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी त्याविषयी कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!