AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भागवत साहेब हेच का तुमचं हिंदू राष्ट्र…?, संघ भूमीत उद्धव ठाकरे गरजले, सरसंघचालकांना दोन प्रश्न

अयोध्येच्या राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाचं 'रामरक्षा' आंदोलन सुरू आहे. आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात आलं, यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरएसएस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भागवत साहेब हेच का तुमचं हिंदू राष्ट्र...?, संघ भूमीत उद्धव ठाकरे गरजले, सरसंघचालकांना दोन प्रश्न
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Jul 18, 2026 | 5:42 PM
Share

अयोध्येमधील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू आहे. आज नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं ‘रामरक्षा ‘ आंदोलन पार पडलं, यावेळी आयोजित सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशासह राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवत उद्धव ठाकरे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘मला मोहन भागवत यांना विचारायचं आहे. एकदोन प्रश्न विचारले पाहिजेत. कारण हे नागपूर आहे. आलोय तर प्रश्न विचारले पाहिजेत.  भागवत साहेब ज्या पद्धतीने भाजप वागत आहे. मंदिर लुटलं जात आहे. पेपर फुटत आहेत. पक्ष तर फोडले जात आहे. आता मंदिरातील तिजोऱ्या फोडल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचं हिंदु राष्ट्र हे नव्हे. आमच्या हिंदुराष्ट्रात राम राज्य अपेक्षित आहे. शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरीबांना विद्यार्थ्यांना न्याय देणारं आमचं हिंदू राष्ट्र आहे. कंत्राटदारांना अभय देणारं हे आमचं हिंदू राष्ट्र असू शकत नाही. भागवत साहेब तुम्ही म्हणाला होता, मुस्लिम या देशातीलच आहे. हिंदुंनी दोन ते तीन अपत्य जन्माला घातली पाहिजे. मग ही आपत्य जन्माला घातली, परीक्षेचे पेपर फुटले, अनेकांनी आत्महत्या केल्या,  त्याचं काय करणार? आणखी अपत्य जन्माला घालून तुम्ही त्यांना असंच चिरडणार? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बाबरी पडली तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे होते. एक फोन आला होता. तेव्हा हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा त्यांनी बुलंद केली. अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं, काहींना अपंगत्व आलं. त्यांनी हा संघर्ष या चोरांच्या पोटापाण्यासाठी  केला नव्हता, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Follow Us
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?