AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला

शुक्रवारी गुजरातच्या अहमदाबादमधील महमूदपुरा परिसरात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृ्त्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहे.

अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला
Factory Explosion Ahmedabad
| Updated on: Jul 18, 2026 | 6:01 PM
Share

Ahmedabad News: गुजरात येथील अहमदाबाद येथे एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट होऊन आग लागल्याने आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात अफरातफर माजली. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहे.

अहमदाबाद येथील महमूदपुरा भागातील गॅट्रेड रोड येथील टॅलेंट फायरवर्क्स फॅक्ट्रीत मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यामुळे संपूर्ण भागात मोठा आवाज आल्याने घबराट पसरली. या दुर्घटनेत आता पर्यंत आठ जणांचे प्राण गेले आहेत. या स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत बचाव मोहीम सुरु केली.

स्फोटाने लोक घाबरले

स्थानिक लोकांच्या मते आग लागल्यानंतर काही वेळाने फॅक्ट्रीच्या आत मोठे स्फोट झाल्याचे आवाज आले. त्यानंतर आजूबाजूच्या भागात दहशत पसरली. जखमींना तातडीने जखमींना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील पाच जखमींवर एलजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून चार जणांना सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे.

आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध

टॅलेंट फायरवर्क्स फॅक्ट्रीचे संचलन मेहुल डोडिया नावाच्या व्यक्तीद्वारे केले जात आहे. या दुर्घटनेचे गंभीरता पाहून अहमदाबादचे महापौर, आयुक्तासह महापालिका आणि प्रशासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बचाव मोहिमेची पाहणी केली. पोलिसांनी संपूर्ण विभागाला घेऊन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण कळलेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आणखी कोणी अडकले आहे का याची तपासणी सुरु केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...