ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनात फडणवीसांचा विषय निघाला अन् माईक बंद पडला; दिपकेंनी मिश्किल अंदाजात टोला लगावला, म्हणाले…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात कॉकरोच जनता पक्षाने जेलभरो आंदोलन पुकारले आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनात फडणवीसांचा विषय निघाला अन् माईक बंद पडला; दिपकेंनी मिश्किल अंदाजात टोला लगावला, म्हणाले...
| Updated on: Oct 02, 2026 | 6:09 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात कॉकरोच जनता पक्षाने जेलभरो आंदोलन पुकारले आहे. यावेळी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी आंदोलकांसोबत संवाद साधला. त्यांनी भाषण करायला सुरूवात केली. या भाषणात त्यांनी सुरूवातीला मुंबई पोलिसांचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. मात्र या भाषणात एक घटना अशी घडली जी आता चर्चेत आली आहे. बोलताना अभिजीत दिपकेंचा माईक बंद पडला. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

अभिजीत दिपकेंनी शिवाजी पार्कवर भाषण केले. या भाषणात अभिजीत दिपकेंनी दिल्ली पोलीस, अमित शाह, नरेंद्र मोदी, आणि आरएसएसवर टीका करण्यात सुरूवात केली. ते बोलत असताना अचानक माईक बंद पडला आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलत होते. त्यांच्यावर टीका करत होते. तेव्हाच माईक बंद पडला. यावर अभिजीत दिपकेंनी मिश्कील टोला लगावला. यामुळे आता त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

Loading...

अभिजीत दिपके म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांवर बोलत होतो म्हणून त्यांनी माईक बंद करायला सांगितलं वाटतं?, असं ते म्हणाले. यामुळे आता याची चर्चा होत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘जेल भरो’ आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान मोठी गर्दी जमलेली दिसत आहे. सीजेपीने ट्विट केले आहे की, शिवाजी पार्क झुरळांनी भरले आहे. एक इंचही जागा सुटलेली नाही.

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच पार्टीच्या आंदोलनादरम्यान अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित आहेत. विशाल ददलानी आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाले आहे. शबाना आझमींनीही या आंदोलनात उपस्थिती लावली आहे. यावेळी बोलताना, आंदोलन करणे हा आमचा हक्क आहे, असे शबाना आझमी म्हणाल्या आहेत. अभिजीत दिपकेंनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता यानंतर सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us