मुंबईतील खासगी शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश सुरु, कसा अर्ज कराल?

| Updated on: Feb 16, 2022 | 10:50 PM

मुंबई विभागातील खासजगी शाळेत 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया (School Admission) सुरू झाली आहे.शिक्षणाचा (Educaiton right) हक्क अधिनियम 2009 (आर. टी. ई.) अन्वये, शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये हा प्रवेश मिळणार आहे.

मुंबईतील खासगी शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश सुरु, कसा अर्ज कराल?
नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा फक्त सकाळीच भरतील.
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांना (Students) आणि पालकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण मुंबई विभागातील खासजगी शाळेत 25 टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया (School Admission) सुरू झाली आहे.शिक्षणाचा (Educaiton right) हक्क अधिनियम 2009 (आर. टी. ई.) अन्वये, शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये हा प्रवेश मिळणार आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित पालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार, मुंबई जिल्ह्यातील एकूण 343 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 6 हजार 469 जागा उपलब्ध आहेत.पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आज पासून पाल्याच्या प्रवेशासाठी शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) या संकेत स्थळावरून किंवा education.maharashtra.gov.in (www नाही) या सरलच्या वेबसाईट मधील विद्यार्थी (Student) या टॅबमधील आरटीई पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात 53 मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पालकांनी संकेतस्थळावरील हेल्प डेस्क (Help Desk) या पर्यायावर Mumbai BMC हा जिल्हा निवडून या मदत केंद्रांची यादी पहावी. सदर केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधा असून त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.

कसा अर्ज कराल?

जे पालक स्वत:हून तसेच इतर कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन व मोबाईल ऍप (Mobile App) द्वारे अर्ज करु शकतात, त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापूर्वी पालकांनी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच नंतरही या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेटी द्याव्यात.ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशासाठी लागणाऱ्या सविस्तर माहितीसाठी महानगरपालिकेच्या mcgm.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्र.) श्री. राजू तडवी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन केले आहे.

मुंबईतील पालकांना मोठा दिलासा

हे शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याआधीच हे पत्रक पालिकेकडून जाहीर करण्यात आल्याने पालकांची चिंता कमी झाली आहे. मुंबईतल्या खासगी शाळांची अव्वाच्या सव्वा फी लक्षात घेता. अनेक गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मोठ्या संख्येने पालकांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येत असल्यानेही मोठा फायदा होणार आहे. पालकांचा यामुळे वेळ वाचणार नाही. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पालकांची प्रवेशासाठी जी वणवण होते, ती यामुळे टळली आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थिनी होणार ‘डॉक्टर”; बदलापूरच्या शबानाचा ‘एमबीबीएस’ला प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांची संख्या वाढवली; वर्षा गायकवाड यांनी सांगिलला परीक्षेचा संपूर्ण प्लॅन

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु वीज वापरात लाखोंच्या घरात, किती लाखांचं वीजबिल?