अभिनेता साहिल खान अडचणीत, महादेव अ‍ॅप प्रकरणात एसआयटी करणार…

| Updated on: Dec 14, 2023 | 1:27 PM

Maharashtra Police Mahadev Betting App Case: | मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमधील सायबर शाखेच्या ३ अधिकाऱ्यांची एसआयटी महादेव ॲप प्रकरणात नेमण्यात आली आहे. एसआयटीने तपासात 139 बँक खात्यांची तपासणी केली. या प्रकरणात साहिल खान याची चौकशी होणार आहे.

अभिनेता साहिल खान अडचणीत, महादेव अ‍ॅप प्रकरणात एसआयटी करणार...
Mahadev Betting App
Follow us on

मुंबई, 14 डिसेंबर | महादेव अ‍ॅप प्रकरणातील आरोपी महादेव बुकचा प्रवर्तक रवी उप्पल याला मुंबई पोलिसांनी दुबईत अटक केली. त्याच्या अटकेनंतर अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. अटक केलेला आरोपी रवी उप्पल आणि त्याचा सहकारी नीरज चंद्राकर 6,000 कोटी रुपयाच्या मनी लँड्रींग प्रकरणाचा मास्टरमाइंड या प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव घेतले जात आहे. एकीकडे ६००० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगचा प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. त्यावेळी मुंबई पोलीसांनी एसआयटी स्थापन केली आहे. त्यात सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला समन्स पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सेलेब्रिटींची चौकशी होणार

महादेव ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘मनी लाँड्रिंग’चा गुन्हाही केला आहे. या प्रकरणात ईडीकडून सेलेब्रिटींची चौकशी सुरू आहे. त्यात साहिल खान याचाही समावेश आहे. या प्रकरणात साहिल खान याने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्यामुळे त्याला समन्स पाठवून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सायबर पोलिसांची समिती

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमधील सायबर शाखेच्या ३ अधिकाऱ्यांची एसआयटी महादेव ॲप प्रकरणात नेमण्यात आली आहे. एसआयटीने तपासात 139 बँक खात्यांची तपासणी केली. त्यातील 57 बँक खाती ब्लॉक केली आहेत. या प्रकरणात साहिल खान याची चौकशी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

भूपेश बघेल का आले अडचणीत

ऑक्टोंबर महिन्यात महादेव ॲप प्रकरणात आरोपी रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर यांच्या विरोधात रायपूर सेशन कोर्टाने रेड कार्नर नोटीस जारी केली. त्यानंतर रायपूर आणि दुर्ग पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली होती. या प्रकरणात नुकतेच शुभम सोनी नावाच्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्याने म्हटले की, भूपेश बघेल यांना त्याने 508 कोटी रुपये दिले आहे. शुभम स्वत:ला महादेव ॲपचा संचालक म्हणतो. पोलीस त्याचा शोध घेत आहे.