होर्डिंगसाठी बेस्टचे एवढे स्पॉट खरेदी केले असतील का, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

बॅनर गद्दारांनी एवढे लावले आहेत की मळमळायला लागले आहे.

होर्डिंगसाठी बेस्टचे एवढे स्पॉट खरेदी केले असतील का, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात
| Edited By: | Updated on: Oct 26, 2022 | 9:34 PM

मुंबई : दहिसरमध्ये दोन्ही शिवसेनेच्यावतीने एकाचवेळी दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विनोद घोसाळकर यांच्या स्वर रंगधार कार्यक्रमाला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांच्याकडे लक्ष देऊ न देता आज मी इथे दिवाळी साजरी करायला आलो आहे, अशी कोपरखडी त्यांनी शिंदे गटाच्या कार्यक्रमाकडे केली.

कोणतंही राजकारण आणू नका. पण, मुंबईकर म्हणून वाटतं होर्डिंग, बॅनर गद्दारांनी एवढे लावले आहेत की मळमळायला लागले आहे. अंत असतो होर्डिंग लावायलाही. होर्डिंग्जसाठी एवढे पैसे आले कुठून. बेस्टचे खरंच एवढे स्पॉट त्यांनी खरंच खरेदी केले असतील. एवढे पैसे कुठून आले. जर नसतील तर बेस्टचे नुकसान कोण भरून देणार, याची उत्तर आली पाहिजेत, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री कोण हे पण देवालाच माहिती. खोके सरकार निवडणूक घ्यायला घाबरत आहे. जर घाबरत नसते तर या 40 आमदारांनी राजीनामा दिला असता. निवडणुकीला सामोरे गेले असते. घाबरून खोके सरकार काम करत आहे. त्यांना निवडणुका घ्यायच्या नाहीत, असेच काम ते करत आहेत, असंही ते म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार करणार तर काय करणार. जे नाराज आहेत जे आमचे झाले नाहीत ते त्यांचे काय होणार, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी गिरीश महाजन यांनाही टोला लगावला. त्यांना तेच कळले नाही म्हणून ते त्यांच्या बरोबर गेलेत. जनतेच्या मनात काय आहे, हे त्यांनी बघावे, असा सल्लाही दिला. त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. कारण मला स्वतःचे हात चिखलात घालायचे नाहीत, असंही ते म्हणाले.

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पोस्टरवर आदित्य ठाकरे म्हणाले, चांगलं आहे. त्यावर काय बोलू.