मनसे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अमित ठाकरे मनसैनिकाच्या भेटीला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

नवी मुंबई : भाजप नगरसेवक विजय चिपळेकर आणि भाजपच्या इतर गुंड कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हॉस्पिटलमध्ये गेले होते. अमित ठाकरे हे नवी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रशांत जाधव यांची चौकशी केली आणि मनसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा […]

मनसे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अमित ठाकरे मनसैनिकाच्या भेटीला

नवी मुंबई : भाजप नगरसेवक विजय चिपळेकर आणि भाजपच्या इतर गुंड कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हॉस्पिटलमध्ये गेले होते. अमित ठाकरे हे नवी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रशांत जाधव यांची चौकशी केली आणि मनसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास दिला.

नेमकी घटना काय घडली?

मनसेवरील रागातून भाजपच्या नगरसेवकाने 29 एप्रिलच्या मध्यरात्री प्रशांत जाधव या मनसैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले. मनसैनिकावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं.

CCTV : मनसेवरचा राग काढला, भाजप नगरसेवकाचा मनसैनिकावर जीवघेणा हल्ला

विजय चिपळेकर हे पनवेल महानगर पालिकेतील कामोठे भागातील नगरसेवक आहेत. 29 एप्रिलला रात्री 12 वाजल्यानंतर विजय चिपळेकर यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा गुंड कार्यकर्ते होते.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. शिवाय गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस स्टेशनवर दबाव आणत आहेत.

पाहा व्हिडीओ :


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI