सावधान !या पुलांवरुन गणपतीची मिरवणूक काढताय, महापालिकेकडून ‘हा’ इशारा

श्रीगणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये. तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात. पुलावर अधिक वेळ न थांबता पुलांवरुन त्वरित पुढे जावे.

सावधान !या पुलांवरुन गणपतीची मिरवणूक काढताय, महापालिकेकडून 'हा' इशारा
गणेश मंडळांना प्रसादाबाबत नवे नियम, अन्न औषध प्रशासन विभागाचे आदेश Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 8:21 PM

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका हद्दीतील सर्व गणेश भक्तांना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पालिका प्रशासनाने इशारा दिला आहे. मध्य रेल्वे (Central Railway) लाईनवरुन जाणारे 4 पूल आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) लाईनवरुन जाणारे 9 पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्वरुपाचे झालेले आहेत. तसेच, या 13 पुलांपैकी काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे महापालिका आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये

श्रीगणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये. तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात. पुलावर अधिक वेळ न थांबता पुलांवरुन त्वरित पुढे जावे. मुंबई महापालिका आणि मुंबई वाहतूक पोलिस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.

पुलावर एका वेळी 16 टनापेक्षा अधिक वजन नको

करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांवर एका वेळेस 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मध्य रेल्वेवरील या पुलांचा समावेश

बृहन्मुंबई महानगरपालिका पालिका हद्दीतील ‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणाऱ्या 4 पुलांमध्ये घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेवरील या पुलांचा समावेश

‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणाऱ्या 9 पुलांमध्ये मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रँटरोड व मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणारा फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज, मुंबई सेंट्रलच्याजवळ असणारा बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज यांच्यासह ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारे सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज आणि केनडी रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.