AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : प्रियकराचा लग्नाला नकार, जीव देण्यासाठी प्रेयसी धावत्या लोकलसमोर! शॉकिंग व्हिडीओ समोर

Byculla Local Suicide Video : लोकल स्थानकात येऊन थांबणार असल्यानं तिचा वेग कमी होता. त्यामुळे लोकल थांबवणं चालकाला शक्य झालं. शिवाय दोघांनी धावत येऊन या तरुणीला रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला हटवलं. नाहीतर अनर्थ घडला असता.

Video : प्रियकराचा लग्नाला नकार, जीव देण्यासाठी प्रेयसी धावत्या लोकलसमोर! शॉकिंग व्हिडीओ समोर
थरारक घटना...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 29, 2022 | 12:33 PM
Share

मुंबई : 22 वर्षीय तरुणीने रविवारी दुपारी आत्महत्या (Mumbai Suicide News) करण्याचा प्रयत्न केला. प्रियकराने लग्नाला नकार दिला म्हणून आत्महत्येसाठी लोकलखाली (Byculla Local Video) जीव देण्याच्या इराद्याने ही तरुणी आली होती. धावत्या लोकलसमोर  ती उभी राहिली. लोकलच्या दिशेने तोंड करुन ही तरुणी उभी होती. या तरुणीने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नांना लोकल चालकाच्या प्रसंगावनधानामुळे यश येऊ शकलं नाही. थोडक्यात या तरुणीचा जीव वाचवलाय. ही सगळी घटना रेल्वे स्ठानकापासून हाकेच्या अंतरावर घडली. त्यामुळे रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांमध्येही घबराट उडाली. रेल्वे स्थानकावरुनच (Mumbai Crime News) प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली होती. महिलेला वाचवण्यासाठी, तिने बाजूला व्हावं यासाठी प्रवासीही रेस्वे स्थानकातून मदतीसाठी आवाज देऊन लागले. एका प्रवाशाने या घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. या व्हिडीओतील प्रवाशांचे आवाज आणि धावत्या लोकलमध्ये उभं राहून महिलेनं केलेला आत्महत्येसाठी प्रयत्न, काळजाचा थरकाप उडवणाराच होता.

नेमकी कुठं घडली घटना?

रविवारी दुपारी भायखळा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. ही तरुणी दादर येथे राहणारी असल्याचं कळतंय. प्रियकराने लग्नासाठी नकार दिला म्हणून या तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं होतं. विशेष म्हणजे ज्या भायखळा रेल्वे स्थानकात ही घटना घडली, त्याच रेल्वे स्थानकावर या तरुणीला तिच्या प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्याचं सांगितलं जातंय. या तरुणीचा प्रियकरही रेल्वे स्थानकात यावेळी हजर होता. त्याच्या देखतच जीव देण्याचा प्रयत्न या तरुणीने केला होता.

पाहा व्हिडीओ :

लोकल भायखळा स्थानकात येऊन थांबणार असल्यानं तिचा वेग कमी होता. त्यामुळे लोकल थांबवणं चालकाला शक्य झालं. शिवाय दोघांनी धावत येऊन या तरुणीला रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला हटवलं. व्हिडीओमध्ये एक आरपीएफ जवान तरुणीच्या दिशेने धावत गेल्याचंही दिसून आलंय. वेळीच या तरुणीला रेल्वे ट्रॅकवरुन हटवलं नसतं, तर अनर्थ घडला असता. थोडक्यात ही तरुणी वाचली असल्यानं भायखळा स्थानकातील प्रवाशांचाही जीव भांड्यात पडला.

पाहा व्हिडीओ :

आरपीएफ निरीक्षक उपेंद्र डागर यांनी या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला अखेर ताब्यात घेतलं. त्या दोघांचही समुपदेशन केलं. नंतर दोघांनाही घरी सोडण्यात आलं. पण या घटनेमुळे भायखळा स्थानकातील लोकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण लोकल चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला होता.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.