AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांच्या शिवीगाळची विधानसभेत तक्रार, छगन भुजबळ यांचा आक्षेप, अध्यक्ष म्हणतात….

संजय राऊत यांनी आज सांगलीत भाषण करताना निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली. याच शिवीगाळचा मुद्दा आशिष शेलार यांनी विधानसभेत मांडला. पण त्यांच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वाची टिप्पणी केली.

संजय राऊत यांच्या शिवीगाळची विधानसभेत तक्रार, छगन भुजबळ यांचा आक्षेप, अध्यक्ष म्हणतात....
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 03, 2023 | 6:22 PM
Share

मुंबई : “अध्यक्ष महोदय, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) विधिमंडळावर काय बोलले यावर आपण हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. अध्यक्ष महोदय, आज त्याच्या पुढची कळी झालेली आहे. एका सभेमध्ये बोलताना संजय राऊत हे असं म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणते शिवसेना त्यांची आहे, तुझ्या बापाची आहे का रे भो… पुढचं मी बोलत नाही”, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानसभेत खासदार संजय राऊत यांची तक्रार केली. त्यांच्या या तक्रारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी यावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.

संजय राऊत यांनी आज सांगलीत भाषण करताना निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली. याच शिवीगाळचा मुद्दा आशिष शेलार यांनी विधानसभेत मांडला. “अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोगाने घोषित केलं म्हणून तुम्ही आणि आम्ही विधिमंडळाचे सदस्य आहोत. निवडणूक आयोगाने आपल्याला जाहीर केलं म्हणून आपण या सभागृहात आलो. निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन करुन आपल्या पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळालं. निवडणूक आयोग हा या सगळ्या प्रक्रियेचा आधार आहे. म्हणून मी हा प्रश्न इथे उपस्थित करतोय”, असं आशिष शेलार म्हणाले.

“शिवीगाळ करुन निवडणूक आयोगाचा उल्लेख. या मंडळाला चोरमंडळ म्हणणं ठीक. नॉटी काय याबद्दलचं उत्तर अजून द्यायचंच आहे. म्हणून या पद्धतीने शिव्या देणारं व्यक्तिमत्व सगळ्या व्यवस्थांवर चोर आणि भो असं म्हणार असेल तर माझी विनंती आहे की, या विषयाची नोंद घ्यावी. अशा प्रकारचं वक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करणं याची नोंद आपण घ्यावी”, अशी विनंती आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

छगन भुजबळ यांचा आक्षेप

यावेळी छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला. “निवडणूक आयोग आहे ना! ते घेतील ना त्यांच्यावर आक्षेप! सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिलाय. निवडणूक आयोगाच्या निकालाबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी इथे थांबतो. बाहेर अनेक संस्था आहेत. त्या संस्थांबद्दल आम्ही बोलणार. इथे त्याचा काय संबंध?”, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

विधानसभा अध्यक्षांची महत्त्वाची टिप्पणी

यानंतर विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. “आपल्या संविधानाने आपल्या जसे अधिकार दिले आहेत तसेच निवडणूक आयोगाला दिलेला आहे. आपलं नियंत्रण त्या यंत्रणेवर नसतं. पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकलाचं विश्लेषण करुन आपण निवडणूक आयोगाच्या कामकाजावर या सभागृहात तरी नाही बोललं पाहिजे. त्यामुळे आपण हा विषय इकडेच थांबवूया”, असं म्हणत त्यांनी या विषयाच्या चर्चेवर पडदा टाकला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?