Bacchu Kadu : भाजपला अध्यक्ष निवडीवर बोलण्याचा अधिकार नाही, पहाटेच्या शपथविधीची बच्चू कडूंकडून आठवण

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत टीका करणाऱ्या भाजपला बच्चू कडू यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्तानं टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

Bacchu Kadu : भाजपला अध्यक्ष निवडीवर बोलण्याचा अधिकार नाही, पहाटेच्या शपथविधीची बच्चू कडूंकडून आठवण
राज्यमंत्री बच्चू कडू
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 2:02 PM

मुंबई: शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्तानं टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. अधिवेशन जादा कालावधीचं असणं आवश्यक आहे. मात्र, कोरोना ओमिक्रॉनमुळं (Omicron) निर्माण झालेली परिस्थिती पाहता कमी कालावधीचं अधिवेशन आहे. इतर राज्यांमध्ये अधिवेशनाचा कालावधी एक ते दोन दिवस होत आहे. अधिवेशनाचे दिवस कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादूर्भावामुळं कमी आहेत. सरकार जाणीवपूर्वक गुंडाळण्याचा प्रयत्न करत नाही, असं बच्चू कडू म्हणाले. अधिवेशनाच्या कालावधीच्या बाबत भाजपच्या (BJP) आरोपांना अर्थ नाही, असंही ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत टीका करणाऱ्या भाजपला बच्चू कडू यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली.

भाजपला तो अधिकार नाही

राज्य सरकार स्थापन करण्यासाठी पहाटेचा शपथविधी घेणाऱ्या भाजपला अध्यक्षांच्या निवडीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. भाजपनं अध्यक्ष कसा निवडावा याबाबत बोलू नये, असं बच्चू कडू म्हणालेय

चालू बील भरावं

सरकारने कॅबिनेटमध्ये महावितरणचं चालू बील शेतकऱ्याकंडून घेण्यात यावं हा निर्णय घेतला. करंट बिलच शेतकऱ्यांकडे मागितलं जातंय. शेतकऱ्यांनी करंट बील भरावं, जाणीवपूर्वक कुणी त्रास देत असेल तर आम्हाला सांगा, असं बच्चू कडू म्हणाले.

भाजपला भान नाही

राजकारणात आजारी माणसासाठी सहानुभूती दाखवली जाते.आजारपणात भान नसलेलं ऊदाहरण म्हणजे भाजप आहे. तो संकृतीवर आधारीत पक्ष आहे पण आता ते संस्कृती विसरले, असल्याची टीका कडू यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर यावं

एसटी कामगारांच्या आंदोलनाची वेळ चुकलीय. कोविडमुळे एसटी तोट्यात गेलीय. मात्र, मंत्र्यांचा ड्रायव्हर 40 हजार कमावतो, पण मोठी 100 माणसांना घेऊन जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरला 12 हजार रुपये मिळतात, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा महत्वाचा आहे. विलीनीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्मचाऱ्यांनी बाजूला व्हावं, असं बच्चू कड़ू म्हणाले.

इतर बातम्या:

रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून आधी अडवलं, नंतर सोडलं; फोनाफोनी कामी आली?

Photo Gallery: कपाटांमध्ये कचऱ्यासारख्या नोटा, रात्र सरली तरी नोटा मोजणे सुरूच; घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

Bacchu Kadu slam BJP over Maharashtra Assembly Speaker Election